उरण : उरण तालुक्यात भुरट्या चोऱ्या घरफोडयांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे,यामुळे उरण परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सतत होणाऱ्या चोऱ्यांच्या सत्रामुळे चोरट्यांवर पाळत ठेवून चिरनेर ग्रामस्थांनी केला चोरट्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली आहे. अखेरीस हे चोरटे पनवेलच्या दिशेने पळताना निदर्शनास आले.
उरण तालुक्यातील उरण पूर्व विभागातील वाढत्या चोऱ्या घरफोड्यायामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उरण तालुक्यातील कळंबुसरे व चिरनेर गावात चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरू होते. पोलिसांत तक्रार दाखल करुनही चोर काही पकडले जात न्हवते त्यामुळे चिरनेर मधील तरुणांई पुढे सरसावली गावाची चोरट्यांपासून सुरक्षा करण्याची वेळ गावातील ग्रामस्थांवर आली.
चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी आणि लहान थोरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षिततेसाठी गावातील तरुणांचे काही ग्रुप तयार केले व चिरनेर परिसरातील मुख्य नाक्या नाक्यावर रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत या तरुणांनी पहारा देण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी चिरनेर गावातील बंद असलेली अनेक घरे फोडून, घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचा धडाका काही दिवसांपासून लावला होता. चोरीच्या सत्रामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते.
काल बुधवारी रात्री हे चोरटे चिरनेर गावात बेसावधपणे चोरी करण्यासाठी शिरले असता गावात गस्त घालणाऱ्या तरूणाईला हे चोरटे चिरनेर परिसरातील महाराष्ट्र बँकेच्या शेजारी हत्यारे घेऊन निदर्शनास आले. चिरनेर मधील तरूणाईने या चोरट्यांना चारही बाजूने घेरले व इतर तरुणांना व्हॉईस नोट करून बोलावण केलं व चोरांना घेरलं, विशेष म्हणजे या चोरट्यांनी चिरनेर व परिसरात सर्व लाईट बंद केली होती.
मोठया संख्येने गस्त घालणारी तरूणाई पाहता चोरट्यांनी काढता पाय घेतला व गावात चोरी न करता पळून गेले. चिरनेर मधील धाडसी तरूणाईने चोरट्यांचा पाठलाग केला असता हे चोरटे त्यांची एमएच 3524 नावाच्या कारमधून पनवेलच्या रस्त्यावरून रस्त्याच्या विरुध्द दिशेने मुंबईच्या दिशेने पळून गेले. चोरटे ज्या कार मध्ये बसले होते ती कार आशिष नंदलाल तिवारी तिवारी या व्यक्तीच्या नावेही कार असल्याचे निदर्शनास आले आहे मुळात ही कार मुंबईतील असली तरी हे चोरटे परप्रांतीय असल्याचे म्हटले जात आहे. चोरट्यांना पळवून लावण्यात यशस्वी झाल्याबंद चिरनेरच्या तरूणाईने सर्वत्र कौतुक होत आहे मात्र गावात चोरी करण्यासाठी साठी चोर आले असता पोलीस प्रशासन मात्र ढिम्म होते त्यामुळे त्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.