नालासोपारा : राज्य दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथून अटक केलेल्या नक्षलवादी कारू यादवचे मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे. मुंबई, भिवंडी, बोरिवली परिसरात विविध कंपन्यांमध्ये काम करत असताना २००४ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेच्या तो संपर्कात आला. झारखंडच्या हजारीबाग येथील रिजनल कमिटीची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या नेतृत्वात १५ नक्षलवादी कार्यरत होते. स्थानिक पोलिसांना हुलकावणी देऊन उपचारांसाठी नालासोपारा येथे वास्तव्यास असताना रविवारी त्याला एटीएसने ताब्यात घेतले. १९९९ मध्ये नोकरीच्या शोधात कारू यादव मुंबईत आला होता. जवळपास तीन ते चार वर्षे त्याने मुंबई, भिवंडी, बोरिवली येथे वेगवेगळ्या कंपन्यांत काम केले.
नालासोपारा गुन्हेगारांसाठी का सुरक्षित?
नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन, प्रगतीनगर, नागीनदास पाडा, बिलालपाडा, श्रीराम नगर, धणीव बाग, गावराईपाडा, वाघराळपाडा, पेल्हार हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे. अवघ्या दोन ते पाच लाखांमध्ये येथे खोल्या उपलब्ध होतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांतील नागरिकांचा मोठी लोकवस्ती या परिसरात आहे. हा परिसर इतका दाटीवाटीचा आहे, की या वस्तीत कोण कुठे राहतो, याचा सहजासहजी शोध लागत नाही. त्यामुळे मुंबईसह परिसरात गुन्हेगारी करून अनेकजण नालासोपाऱ्याचा आश्रय घेतात. त्यामुळेच ‘गुन्हेगारों का सहारा, नालासोपारा’ अशी ओळखही या भागाची झाली आहे.
नालासोपारा, विरार, वसई या पूर्वेच्या चाळीतील भागांत आम्ही वारंवार कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे. तेथील प्रत्येक भाडोत्रीची माहिती गोळा केली जात आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाई पुन्हा तीव्र करणार आहोत.
- प्रशांत वागुंडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ- ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.