Crime News : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मुन्नाभाई स्टाईल कॉपी; 4 गुन्ह्यांची नोंद

Crime News
Crime News
Updated on

मुंबई : 7 मे रोजी मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबईत पार पडली. मात्र पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत गैरप्रकार करणारे परीक्षार्थी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

कॉपी करणाऱ्या उमेदवारांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडुप पोलिस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळेस उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसाना निदर्शनास आले आहे. (Latest Marathi News)

Crime News
Assam: "बडे पापा म्हणत तरुणीने.." पॉर्न साइटवर स्वतःचा व्हिडीओ पाहताच 78 वर्षीय वृद्धाची आत्महत्या

पोलीस कारवाई

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून काॅपी करू पाहणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. रविंद्र काळे, नितेश आरेकर, अशोक ढोले, या आरोपींना पोलिसांनी 41 अ ची नोटीस देऊन सोडलेले आहे. तर युवराज जारवाल, बबलु मेढरवाल, या दोघांवर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या आरोपीच्या साथीदारांचाही पोलिस शोध घेत आहेत. (Marathi Tajya Batmya)

Crime News
Divorce Case : अखेर नोकरी नसलेल्या पतीला पोटगी देण्यास पत्नी तयार! घटस्फोटाचा दावा निकाली

मुन्नाभाई स्टाईलने कॉपी

मुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात. तशीच काहीशी पद्धत पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यानी अवलंबली होती कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे हद्दीतील जे बी खोत हायस्कूल केंद्रावर रविंद्र काळे नावाचा उमेदवार कानात ब्ल्यू टूथचा वापर करून पेपर सोडवत होता. त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहे.

इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर

भांडुप परीक्षा केंद्रावर केंद्रावर बबलूसिंग मेंढरवाल हा परीक्षार्थी इलेक्ट्रीक इअरबर्डद्वारे अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात राहून पेपर सोडवत होता.विशेष म्हणजे त्याने उजव्या हातामध्ये मनगटापासून कोपर्यापर्यंत सनग्लोव्ज घातले होतें.त्यामध्ये सिमकार्ड ,चार्जिंग सोकेट ,मायक्रो माइक असलेले आयताकृती इलेक्ट्रनिक डिव्हाईस असे साहित्य लपवले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे. भांडुप व मेघवाडी पोलिस ठाणे परिसरातील केंद्रावरही अशाच प्रकारे काॅपी करण्याचा प्रयत्न केला गेला.

Crime News
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक लंडन दौऱ्यावर; तर झिरवळ म्हणतात, मी आमदारांना अपात्र करेन!

पोलीस बंदोबस्त

पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचे आयोजन केले होते.लेखी परीक्षा 7 मे रोजी एकाचवेळी मुंबईतील एकुण 213 केंद्रांवर आयोजित करण्यात आली. परीक्षेस 83748 परीक्षार्थीपैकी एकुण 78522 परीक्षार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेकरीता एकुण 1246 पोलीस अधिकारी आणि 5975 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.