Crime News: सोशल मीडियावर ओळख वाढवून त्याला ऑनलाईन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 20 ते 40 टक्के तात्काळ परतावा मिळेल. असे आमिष भामट्यांनी दाखवित तरुणाची 17 लाखाला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
रामनगर परिसरात राहणारे आल्हाद अनिल रानडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्स अपवर एक मॅसेज आला. अर्धवेळ नोकरी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता अशा आशयाचा तो संदेश होता. अनिल यांनी त्याला रिप्लाय दिला असता समोरून रितू नावाच्या महिलेने आम्ही तुम्हाला दिलेल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा.
तुम्हाला तात्काळ 210 रूपये मिळतील असे सांगितले. त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर आल्हाद यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही संदेश आले. त्या आल्हाद यांनी भरून दिल्या. त्यात आल्हाद यांच्या बँक खात्यांची माहिती भरून घेण्यात आली.
इनस्टाग्रामच्या 147 सदस्य असलेल्या गटात आल्हाद यांना सामावून घेण्यात आले. ग्रुप प्रमुख कपील सिंग, एमेली सिंग यांनी आता तुम्ही जेवढी रक्कम गुंतवाल त्या रकमेचे गुगल मॅप, पंचतारांकित हॉटेल गुणांक द्याल तेवढ्या बदल्यात तुम्हाला 20 ते 40 टक्के केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा तात्काळ मिळेल, असे आश्वासन भामट्यांनी दिले
इतर सदस्य आल्हाद यांना ग्रुपमधून गुंतवणुकीतून आकर्षक परतावा तात्काळ मिळत असल्याचे दाखवून देत होते. आल्हाद यांना त्याचा अनुभव येत होता. कमी कालावधीत वाढीव परतावा मिळत असल्याने आल्हाद यांनी एचडीएफसी, ॲक्सिस, आयसीआयसीआय, फेडरल, पंजाब नॅशनल अशा बँक खात्यामधून 20 ते 40 हजार रूपये टप्प्याने मागील महिनाभराच्या कालावधीत गुंतवले.
एकूण 17 लाख 33 हजार रूपये भरणा केल्यानंतर आल्हाद यांना संरक्षित रक्कम, रक्कम परतावा, कर तपासणी नावाखाली पैसे भरण्यास सांगत होते. एवढी रक्कम आपणाकडे नाही असे आल्हाद यांनी कळविताच भामट्यानी त्यांच्या बँक खात्यामधील रक्कम आल्हाद यांच्या खात्यात पाठविल्या. त्या रकमांचा तक्रारदाराने वापर करून त्यांनी दिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्या. आता आपली रक्कम परत मिळाली पाहिजे या प्रयत्नात आल्हाद होते.
रक्कम परत हवी असेल तर आणखी रकमा भरणा करा, असा आग्रह कपील, एमिली यांनी धरला. ही रक्कम भरणा केली नाही तर तुमची रक्कम परत मिळणार नाही असे सांगून आल्हाद रानडे यांना भामट्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यांना व्हॉट्सअॅप गटातून बाहेर काढले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर आल्हाद यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.