Crime News: आयडीएफसी बँकेची लाखोंची फसवणूक; 6 विरोधात गुन्ह्याची नोंद

बँकेच्या बीकेसी शाखेची 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे | Bank's BKC branch has been defrauded of Rs 26 lakhs
Crime News: आयडीएफसी बँकेची लाखोंची फसवणूक; 6 विरोधात गुन्ह्याची नोंद
Updated on

Mumbai News: बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने 26 लाख रुपयांचे कर्ज घेऊन आयडीएफसी फर्स्ट बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या बीकेसी शाखेची 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (bank crime)

Crime News: आयडीएफसी बँकेची लाखोंची फसवणूक; 6 विरोधात गुन्ह्याची नोंद
Nashik Crime News : चाकूचा धाक दाखवून जबरी लुट! कॉलेजरोडवरील घटना; वृद्धावर चाकूने वार

या प्रकरणी बीकेसी पोलिसांकडून अमित कुमार शर्मा , अभिषेक अग्रवाल , रमेश कुमार , वरुण शर्मा , विवेक सिंग आणि दर्शन सिंग या 6 आरोपीविरोधात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या शिवाय फसवणूक करणाऱ्यांनी बँकेकडून होणाऱ्या केवायसी छाननी प्रक्रियेसाठी बोगस कागदेपत्रे दिली होती. सोबतच याच कागदपत्रांचा वापर करून बँक खाती उघडण्यात आली होती. कर्ज घेतलेल्या पैकी एका आरोपीने कर्जाची परतफेड केलेली नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आयडीएफसी बँकेच्या प्रादेशिक बँक व्यवस्थापक आणि उपाध्यक्ष प्रमोद अमेता यांनी या प्रकरणी मागील महिन्यात 21 मार्च रोजी बीकेसी पोलिसात गुन्ह्याची नोंद केली होती. नोंदवला. दैनंदिन तपासणी करत असता अमेता याना अनेकांनी वैयक्तिक कर्जात अनियमितता केल्याचे आढळून आले, त्यानंतर त्यांनी कर्जाच्या वितरणा बाबत चौकशी सुरू करण्यास सांगितले.

Crime News: आयडीएफसी बँकेची लाखोंची फसवणूक; 6 विरोधात गुन्ह्याची नोंद
Nashik Crime News : दामदुप्पट योजनेतून 2 कोटींचा गंडा! मुख्य संशयिताला अटक; तक्रारींसाठी पोलिसांचे आवाहन

चौकशीत आरोपीं कर्जधारकानी सादर केलेली कागदपत्रे आयकर विभागाकडे असलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी असल्याचे निष्पन्न झाले. सोबतच आरोपी कर्जधारकांचे आधार कार्डशी लिंक केलेल्या पॅन कार्डचे तपशील जुळत नसल्याचे सापडले. अखेर 6 आरोपी कर्जधारकाविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Crime News: आयडीएफसी बँकेची लाखोंची फसवणूक; 6 विरोधात गुन्ह्याची नोंद
Crime News: धक्कादायक! आधी सामूहिक बलात्कार, नंतर कापली जीभ.. मालकिणीचे नोकराणीवर अमानुष अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.