Crime News : फ्लाईटमध्ये विमान हायजॅकिंगचे संभाषण; आरोपी प्रवाशाला अटक

Crime News
Crime News
Updated on

मुंबई : विस्तारा फ्लाइटमध्ये फोन कॉलवर 'हायजॅकिंग'बद्दल संभाषण करून संभ्रम निर्माण केल्या प्रकरणी सहार पोलीसांकडून एका प्रवाशाला गुरूवारी रात्री अटक करण्यात आली आहे. रितेश संजयकुकर जुनेजा असे अटक आरोपी प्रवाशाचे नाव असून फ्लाइट क्रू मेंबर्सच्या तक्रारीवरून आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली.

Crime News
Mumbai Crime : पालिकेचे मध्यवर्ती खरेदी खाते 'ईडी'च्या रडारवर; अधिकारी-कर्मचारी धास्तावले

क्रू मेंबरने रितेशला फोनवर विमानाच्या हाय जॅकिंग संदर्भात संभाषण करताना ऐकले होते. प्रवाशाने तो मनोरुग्ण असल्यामुळे असे संभाषण केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सहार पोलिसांनी आरोपी रितेश जुनेजावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहार पोलीसांकडून सुरू आहे.

Crime News
Manipur Violence: शहांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, कारण...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली.गुरूवारी मुंबईहून दिल्लीला जाणार्‍या विस्तारा विमानात एका प्रवाशाने विमान हायजॅक केल्याची चर्चा झाल्याने खळबळ उडाली.

त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून सर्व प्रवाशांचे भान सुटले. अशा परिस्थितीत विस्तारा फ्लाइटचे केबिन क्रू प्रवाशांना सीट बेल्ट बांधण्यास सांगत होते. दरम्यान, आरोपी फोनवर संभाषणात गुंतला होता. दिल्लीला फ्लाईट उड्डाण करण्यापूर्वी क्रू मेंबरने पोलिसात तक्रार दाखल केली आणि सहार पोलिसांनी आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.