Crime News : राजस्थानी कुमावत गँग दिंडोशी पोलिसांकडून जेरबंद

इंदौर येथील व्यापाऱ्यास फसवणुक करून राजस्थानी कुमावत गँगला जेरबंद करण्यात दिंडोशी पोलिसांना यश
Crime News  Rajasthani Kumawat gang arrested Dindoshi Police mumbai
Crime News Rajasthani Kumawat gang arrested Dindoshi Police mumbaiesakal
Updated on

मुंबई : इंदौर येथील व्यापाऱ्यास फसवणुक करून राजस्थानी कुमावत गँगला जेरबंद करण्यात दिंडोशी पोलिसांना यश मिळाली आहे. या गँगच्या 5 आरोपींना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.विक्रम अचलाराम कुमावत, मुकेश तगाराम कुमावत हसमुख पुखराज सुराणा, मोहनलाल अचलाराम कुमावत, विक्रम लालचंद सुराणा अशी आरोपीची नावे आहेत.

या प्रकरणात फिर्यादी उज्वल रामप्रसाद चांडक यांच्या मोबाईलवर 17 डिसेंबरला त्यांचे परिचयाचे इंदौर येथे राहणारे व्यापारी भुरामल जैन यांच्या नावे फोन आला. फोनच्या संभाषणात भुरामल जैन म्हणून बोलत असलेल्या व्यक्तीने फिर्यादी उज्वल चांडक याना त्यांचे प्रसिद्ध कपड़े व्यापारी मित्र जितमल जैन यांच्या मुला संदर्भात मदत मागितली .

जितमल जैन यांचा मुलगा यश जैन याचे वीस लाख रूपये हे इंदौर येथून मुंबईत पाठवायचे असल्याची उज्वल चांडक यांना सांगितले. त्या व्यक्तीने यश जैनचा मोबाईल नंबर उज्वल चांडक यांना देऊन व त्याच्यासोबत बोलणे करण्यास सांगितले. 17 डिसेंबर रोजी फिर्यादी उज्वल चांडक यांनी सांगितल्या प्रमाणे सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यश जैन याने त्याचा एक माणूस 20लाख घेवून येईल ते पैसे इंदौरवरुन मुंबई येथे पाठवायचे आहेत त्यासाठी मदत करण्यास सांगितले. पिडीत चांडक यांनी होकार दिला.

काही वेळाने यश जैन याने पिडीत व्यक्तीला सांगितले की पैसे घेऊन येणाऱ्या माणसाला अजून वेळ लागणार आहे . त्यामुळे उज्वल चांडक यांनी स्वत:जवळील वीस लाख रुपये मालाड, मुंबई येथील साथीदार महावीर भाई, यास पाठविण्याची यश जैन यानी विनंती केली. तक्रारदार चांडक यांनी यश जैन यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन सदरची रकम अंगडीयामार्फत यश जैनचा साथीदार महावीर भाई यास मुंबई येथे पाठविली.

यश जैन याने बराच वेळापर्यंत फिर्यादीस पैसे न पाठविल्याने फिर्यादी व भुरामल जैन यांनी यश जैन व महावीर भाई यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांचे फोन स्विच ऑफ आढळुन आले. त्यानंतर भुरामल जैन यांनी त्यांचा मित्र जितमल जैन यास याबाबत कळविले.जितमल जैन यांनी त्यांचे मुलाचे नाव यश जैन नाही, तसेच यश जैन याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांचे मुलाचा नसल्याचे सांगितले. यावरून आरोपींनी आपल्या सोबत फसवणूक केल्याचे चांडक यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने दिंडोशी पोलिसात गुन्ह्याची नोंद केली.

दिंडोशी पोलिसानी गुन्हा नोंदवत तपासकार्यात दोन पोलीस पथके नेमली. पोलीस पथकांनी तांत्रिक तपास करून सदर गुन्हयातील आरोपांपैकी दोन आरोपी है कुरारगाव मालाड पूर्व मुंबई येथे राहत असलेल्याबाबत माहिती प्राप्त केली. त्यानंतर कुरारगाव येथील तानाजीनगर परिसरातुन दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे इतर पाहिजे आरोपीताबाबत चौकशी करून लागलीच इतर तीन आरोपींना राजस्थान येथे पळुन जाण्याचे बेतात असल्याची पोलिसाना माहिती मिळाली.

पोलीसांनी सापळा रचून विरार पश्चिम येथुन शिताफिने आरोपींना ताब्यात घेतले . अटक केलेल सर्व आरोपी हे राजस्थान येथील पाली जिल्हयातील रहिवासी आहेत. आतापर्यंत गुन्हयात फसवणुक झालेल्या रकमेपैकी रुपये 14 लाख रोख रक्कम आरोपीताकडुन हस्तगत करण्यात आली आहे. अटक आरोपीपैकी एक हसमुख पुखराज सुराणा याच्याविरुध्द मुबई, ठाणे तसेच कर्नाटक येथे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.