Crime News: धक्कादायक! रात्री घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करत अत्याचार

Titwala: कल्याण रेल्वे रेल्वे पोलिसांनी आरोपी निशांत चव्हाण याला अटक केली आहे.
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

Crime : कामावरून रात्री घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करीत टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक झुडूपात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. १३) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण रेल्वे रेल्वे पोलिसांनी आरोपी निशांत चव्हाण याला अटक केली आहे.

Crime News
Crime:'जर आवाज केला तर परत..'महिला घरी एकटी असताना पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलेवर सामुहिक अत्याचार

पीडित महिला शहाड येथे एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली होती. स्थानकावर उतरल्यानंतर ती शेजारीच असलेल्या रुळावरून आपल्या घरी जात होती.

या वेळी निशांत चव्हाण तिचा पाठलाग करत होता. पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत असल्यामुळे ती गाफील होती. पाठलाग करणाऱ्याने तिला जबरदस्तीने रुळालगत असलेल्या झुडूपात ओढून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. घटनेची कुठेही वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली.

Crime News
Mumbai Crime: मुंबईत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ..; प्रतिदिन 16 गुन्ह्यांची नोंद

परिसरातील नागरिक आले धावून

घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार फोनवरूनच आपल्या पतीला सांगितला. पतीने लगेचच त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना फोन करून घटनेची माहिती देऊन मदत मागितली. तात्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला चोप दिला.

त्यानंतर पोलिसांना सांगून ताब्यात देण्यात आले. निशांत चव्हाणला अटक करण्यात आली असून कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत चव्हाण पडघा येथील खासगी कंपनीत काम करतो. याप्रकरणी एसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Crime: बहिणीसोबत झालेल्या झटापटीत दारुड्या भावाचा मृत्यू  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.