Crime News: कोयते हातात घेत व्हिडीओ स्टेट्सला ठेवणं पडलं महागात; स्टेट्स पाहून पोलिस दारात हजर

Crime News
Crime Newsesakal
Updated on

डोंबिवली: सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करत लाईक्स मिळविण्यासाठी तसेच आपला एक दरारा निर्माण करण्यासाठी अनेकजण हातात बंदुक, तलवार घेऊन व्हिडिओ बनविताना दिसतात. कोणी हातात तलवार घेऊन केक कापतो तर कोणी हळदीत फायर करतो.

असे व्हिडीओ तयार करुन समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्यांवर आता पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण मधील एका तरुणाने अशाच पद्धतीने चार कोयते हातात घेत व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला. त्याची ही हौस त्याच्या आता अंगलट ाली असून कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. प्रदीप यादव असे या तरुणाचे नाव आहे.

Crime News
Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार

हातात तलवारी, धारदार शस्त्र घेत भर रस्त्यात धुमाकूळ घालणे, तलवारीने केक कापणे, लग्न समारंभ, हळदीच्या कार्यक्रमात तलवारी नाचविणे, बंदूकीतून फायर करणे यांसारख्या घटना कल्याण डोंबिवलीत वाढत आहे. दहशत निर्माण करणे यासोबतच एक स्टेट्स निर्माण करण्यासाठी अनेक नागरिक अशा पद्धतीचे व्हिडीओ समाज माध्यमावर अपलोड करु लागले आहेत.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच समाजात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आता सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओंवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहात असलेल्या प्रदीप यादव याने सोशल मिडीयावर हातात चार कोयते घेऊन रिल्स बनविलेला व्हिडीओ अपलोड केला होता.

Crime News
Ahmednagar: नगरचं अहिल्यानगर करून भाजपने प्रस्थापितांचा केला गेम? नामांतरामागची खेळी

हौस म्हणून त्याने व्हिडीओ स्टेट्सला अपलोड केला परंतू त्याची ही हौसच त्याच्या अंगलट आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तात्काळ या तरुणाचा शोध घेतला. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात तो रहात असल्याचे पोलिसांना समजताच तेथे जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कोयते जप्त करत याचा अधिक तपास सुरु केला आहे.

यापुढे सोशल मिडीयावर अशा पद्धतीचे हातात शस्त्र बाळगून व्हिडीओ अपलोड करताना नागरिकांनी काळजी घ्यावी. शहरात शांतता व सुरक्षिततेतेचे वातावरण असताना असे व्हिडीओ बनवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील. त्यामुळे व्हीडीओ बनविताना व ते व्हायरल करताना विचार करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.