Crime News: महिलेला चिरडणाऱ्या त्या डॉक्टरला मिळाला जामीन, वाचा काय आहे प्रकरण?

महिलेला चिरडणाऱ्या त्या डॉक्टरला मिळाला जामीन, वाचा काय आहे प्रकरण?
Crime News: sakal
Updated on

Crime News: निष्काळजीपणाने वाहन चालवून रूबेदा शेख (६०) या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या सायन रुग्णालयातील डॉक्टर राजेश ढेरे यांना वीस हजार रुपयांच्या जामीनावर मुक्त करण्यात आले.

या डॉक्टरविरुद्ध निष्काळजीपणे आणि हयहईने वाहन चालवून रूबेदा शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा तसेच अपघाताबाबत खोटी माहिती देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेला चिरडणाऱ्या त्या डॉक्टरला मिळाला जामीन, वाचा काय आहे प्रकरण?
Crime News: एनएसयूआयच्या पुणे विद्यापीठ अध्याक्षाविरोधात गुन्हा; विद्यार्थिनीचा केला छळ

यासंदर्भात शीव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (अ ), ३३८, २७९, २०३, १७७ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सायन रुग्णालयाच्या ओपीडी बिल्डिंग समोरच हा अपघात झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर ढेरे यांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास उशीर झाल्याने गुन्हा नोंदही उशिरा झाली.

महिलेला चिरडणाऱ्या त्या डॉक्टरला मिळाला जामीन, वाचा काय आहे प्रकरण?
Crime News: एनएसयूआयच्या पुणे विद्यापीठ अध्याक्षाविरोधात गुन्हा; विद्यार्थिनीचा केला छळ

रूबेदा शेख या शुक्रवारी रात्री ओपीडी बिल्डिंगच्या गेट क्रमांक सात समोर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर रुग्णालयाच्या आवारातच त्यांना मोटारीची धडक बसल्याचे आढळून आले. सुरुवातीला ढेरे यांनी तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघाताबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप रूबेदा शेख यांच्या नातलगांनी केला आहे. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी ढेरे यांना अटक केली.

महिलेला चिरडणाऱ्या त्या डॉक्टरला मिळाला जामीन, वाचा काय आहे प्रकरण?
Crime News: चोरीच्या गुन्ह्यांत ४० वर्षांच्या नर्सला अटक, वाचा काय आहे प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.