Kalyan Crime NEws : ठाकुर्ली कचोरे येथील गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या होत्या. चोरट्यांनी आधी देवीची आरती करुन त्यानंतर पादुका चोरुन नेल्या होत्या.(thakurli news)
एकाच मंदिरात दोन वेळा चोरीची घटना घडल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा सुरु झाल्याने या चोरट्यांना पकडणे टिळकनगर पोलीसांसमोर आव्हान होते. सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन नवी मुंबईतील तुर्भे येथून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (maharashtra news)
राजेश उर्फ राजू वंजारे (वय 34), कैलास राजजग निषाद (वय 54) आणि फारुख अली मोहम्मद हनीफ शेख (वय 39) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चांदिच्या पादुका हस्तगत केल्या आहेत.
ठाकुर्ली 90 फिट रोडलगत कचोरे गावाबाहेर ग्रामस्थांचे दैवत गावदेवी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या चांदिच्या पादुका या शुक्रवारी दुपारी चोरीला गेल्या होत्या. चोरट्यांनी चोरी करण्याआधी देवीची पूजा केली त्यानंतर देवीच्या पादुका घेऊन त्यांनी तेथून धुम ठोकली होती.
सायंकाळी ग्रामस्थ सांजवात वेळी मंदिरात आले असता त्यांना देवीच्या पादुकांची चोरी झाल्याचे समजले. ग्रामस्थांनी मंदिर व आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र पादुका कोठेही आढळून आल्या नाहीत. मंदिरातील सीसीटिव्ही ग्रामस्थांनी पाहिले असता चोरट्यांचा हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला होता.(mumbai news )
या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जमादार श्याम सोनावणे, सतीश पगारे, अजित राजपूत, संदीप सपकाळे, उमेश राठोड आणि भूषण पवार यांच्या पथकाने तपास सुरु केला. सीसीटिव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार यांच्या मार्फत पोलिसांना चोरटे नवी मुंबईचे असल्याची बाब उघड झाली.(thane crime news)
तिघे चोरटे नवी मुंबईतील तुर्भे येथील झोपडपट्टीत लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. पोलिसांचा मागोवा लागताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिघांना शिताफीने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो वजनाच्या सुमारे 30 हजार रुपये किंमतीच्या देवीच्या चांदिच्या पादुका हस्तगत केल्या आहेत. देवीच्या पादुका मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.