Mumbai Crime: खुनाच्या गुन्हयातील एका आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले आहे. ही हत्येची घटना कांजूरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. यातील अटक आरोपीचे नाव राजेश यादव असे असून, त्याने हा खून गेल्या 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री केला होता. तर या बाबत 6 फेब्रुवारी रोजी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
रूपाबाई चाळ, निर्वाणा बिल्डींगच्या मागे, कांजूर मार्ग येथे ही घटना घडली होती. यातूनच राजेश सियाराम यादव हाही रूपाबाई चाळ, निर्वाणा बिल्डींगच्या मागे राहत असून, ही खुनाची घटना 6 फेब्रुवारी रोजी घडली. दुपार नंतर आरोपी हा यातील फिर्यादीच्या मालकीचे भाड्याने दिलेल्या रूम क्रमांक 3 रूपाबाई चाळ, निर्वाण बिल्डिंगच्या मागे, कांजूरमार्ग पूर्व या रूममध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. राजेश यादव याने त्याची पत्नी दिपा हिला काही कारणावरून जीवे ठार मारून कापडी पट्टीने हातपाय बांधून, बेडशीट मध्ये गुंडाळून ठेवून पळून गेला म्हणून फिर्यादीने तक्रार फिकिंहिती.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या गुन्हयाचा समांत्तर तपास कक्ष 7 कडून तात्काळ सुरू करण्यात आला. गुन्हा घडल्यापासून मयत महिलेचा पती फरार असल्याचे दिसून आले. त्यामुळे कक्ष-7 गुन्हे शाखेची 4 पथके तयार करून परीसरातील सी.सी.टि.व्ही.फुटेज तपासण्यात आले.
फरार आरोपी हा त्याचे मुळ गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलीस निरीक्षक, अधिकारी नीरज उबाळे, विकास होनमाने हे तात्काळ गाझिपूर, उत्तरप्रदेश येथे रवाना झाले. अधिकारी काळे व शेलार यांना तांत्रिक तपासाव्दारे आरोपी त्याचे मुळ गावी न जाता गाव नैसारे, पो.देवासिहा, सैदपूर, जि.गाझिपूर येथे असल्याचे तांत्रिक तपासामध्ये दिसून आले. त्यामुळे त्यांनी उत्तरप्रदेश येथे रवाना झालेल्या पथकास सदर ठिकाणी रवाना केले.
उबाळे आणि होनमाने यांनी कौशल्याचा वापर करून तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. त्याला कांजूरमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही यशस्वी कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महीला पोलीस अधिकारी बाळगी, अधिकारी उबाळे, कदम, शेलार, काळे, परबळकर, धुमाळ, नाईक, सावंत अंमलदार पवार, गुरव, शिंदे, मोरे, कांबळे, जोशी, बल्लाळ, शिरापुरी, गलांडे, जाधव, महीला पोलीस तिरोडकर, राऊत, यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.