नालासोपारा : व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लील सिनेमे पाहून अल्पवयीन मुली, महिलांना पाहताच अश्लील वर्तन करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नालासोपारा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं ही कारवाही केली आहे. या आरोपीवर मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरारसह अन्य भागात 18 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. (Criminal arrested from Mumbai who was doing obscene behavior after seeing women)
कल्पेश गोपीनाथ देवधरे (वय 30) असे या विकृत आरोपीचं नाव असून त्याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. हा मूळचा श्रीवर्धनचा (रायगड) रहिवासी असून त्याच मुंबईत विविध ठिकाणी वास्तव्य होतं. व्यावसायानं वाहन चालक असून या आरोपीनं 18 एप्रिल रोजी एका नऊ वर्षाच्या मुलीशी अश्लील वर्तन केले होते. याप्रकरणात मिरारोड नयानगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376 सह पोस्को कलम 8 अन्वेय गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारचे गुन्हे अनेक ठिकाणी दाखल होते.
आरोपीकडून पुन्हा असा गुन्हा घडू नये आणि जनतेत सुरक्षिततेची भावना कायम राहावी यासाठी गुन्हे शाखा कक्ष एकच्या टीमनं याचा तपास सुरू केला होता. गुन्ह्याच्या घटनास्थळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गाची पाहणी करून माहिती घेतली असता आरोपी नालासोपाऱ्यातून मिरारोडला आणि पुढे मिरारोडवरून मुंबईला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला नालासोपाऱ्यातून अटक केली. अटकेनंतर चौकशीत त्यानं 18 गुन्ह्याची कबुली दिली.
व्हिडिओ पार्लरमध्ये अश्लील सिनेमे पाहून जडली विकृती
वयाच्या 20 व्या वर्षांपासून व्हिडिओ पार्लरमध्ये या आरोपीला अश्लील चित्रपट पाहण्याची सवय जडली होती. सन 2011 पासून त्याच्याकडून महिलांना पाहून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात झाली. पुढे वारंवार महिला किंवा अल्पवयीन मुलींना पाहून तो अश्लील वर्तन करत राहिला. अशा कृत्यातून आपल्याला मानसिक आनंद मिळत असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. अशा प्रकरणांमध्ये त्याच्यावर मुंबईच्या कांदिवली, दिंडोशी, पंतनगर, गोरेगाव चुनाभट्टी, पार्कसाईट, कस्तुरबा, बांगूर नगर, पवई, गोवंडी, डी एन नगर, सायन विलेपार्ले, कुरार, वसई माणिकपूर, मिरारोड या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सन 2021च्या मध्य रेल्वेच्या गुन्ह्यात तो फरार होता. सायन पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात त्याला दीड वर्षांचा तुरुंगवासही झाला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.