Crocodile in BKC: बीकेसीत मगर आढळल्यानं खळबळ! नागरिकांना वन विभागानं केलं महत्वाचं आवाहन

मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं ही मगर दिसून आल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे.
BKC_Crocodile
BKC_Crocodile
Updated on

मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये चक्क मगर आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं ही मगर दिसून आल्याचं वनविभागानं म्हटलं आहे. ही मगर धीरुभाई अंबानी शाळेजवळून वाहणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात आढळून आली आहे. यामुळं परिसरात मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे.

BKC_Crocodile
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात! वित्त विभागाला खर्चाबाबत भेडसावतेय चिंता

बीकेसी परिसरात मगर आढळल्याची माहिती तात्काळ वाईल्ड लाईफ ऍनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशननं वन विभाग तसेच RAWW या संस्थेला देण्यात आली. यानंतर वनविभागाने ताबडतोब मगर आढळून आलेल्या ठिकाणी पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

BKC_Crocodile
Sangli Flood Viral Video: 'आयर्विन' पूलावरून कृष्णेत उडी; पुरातील स्टंटबाजी आली अंगलट, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं मिठी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात ही मगर वाहत आली असावी असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच ही मगर मानवी वस्तीत नसून तिच्या नैसर्गिक अधिवासातच आहे, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे.

अद्याप या मगरीचा शोध घेण्याचं काम वनविभागाकडून सुरू असून मगरीला रेस्क्यू करण्यात यश आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.