डोंबिवली : गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा गंडा; आरोपी गजाआड

fraud crime
fraud crimesakal media
Updated on

डोंबिवली : कमी कालावधीमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवित गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा (Investors crore rupees fraud) घालणाऱ्या ठगास आर्थिक गुन्हे अन्वेषन विभाग ठाणे यांनी बदलापूरहून अटक केली आहे. आदित्य हेमंत रेडीज (वय 26) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव (culprit arrested) असून यातील आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे. आत्तापर्यंत 9 ते 10 हजार गुंतवणूकदारांची अंदाजे 22 ते 23 कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे यावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

fraud crime
घटस्फोटित, विधवांना स्वयंरोजगाराचा आधार; BMC कडून मदतीचा हात

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या रेखा झोपे या महिलेने नोव्हेंबर 2020 मध्ये डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषन विभाग ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हे अन्वेषन विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक समीर शेख व त्यांचे पथक गुन्ह्याचा तपास करीत होते.

आरोपी आदित्य याने गुन्ह्यात अटक आरोपी अरुण गांधी व अन्य साथीदारांसह संगणमत करुन अॅग्रो मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी लिमिटेड (आधीचे नाव कालीकाई ॲग्रो मल्टी स्टेट सोसायटी) कंपनी सुरू केली होती. तक्रारदार महिला रेखा झोपे व अन्य गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठेवींपोटी त्यांच्याकडून रक्कमा घेतल्या. या कंपन्यांत गुंतवणूकदारांनी मिळून 35 लाख 38 हजार 350 रुपयांची गुंतवणूका केल्याचे समोर आले होते.

fraud crime
"माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी व्हिजन ठेऊन काम करण्याची गरज"

आत्तापर्यंत केलेल्या तपासात गुन्हे विभागास सदर कंपन्यांनी जवळपास 9 ते 10 हजार गुंतवणुकदारांची अंदाजे 22 ते 23 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी आदित्य रेडीज याच्यासह त्याचे वडील हेमंत रेडीज व आई मानसी रेडीज हे तिघेही गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता झाले होते. त्यांचा पोलिस शोध घेत आहे. बदलापूर परिसरात आदित्य असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आदित्यला बदलापूर येथून 24 जानेवारीला अटक करण्यात आली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अॅग्रो मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी लिमिटेड व कालीकाई ॲग्रो मल्टी स्टेट सोसायटी या कंपनीत गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.