उल्हासनगर : प्रेमसंबंध नाकारणाऱ्या फुलविक्रेत्या विधवा महिलेवर कोयत्याने हल्ला

Crime News
Crime Newssakal media
Updated on

उल्हासनगर : प्रियकरासोबत प्रेमसंबंध (love relationships) ठेवण्यास नकार देणाऱ्या फुलविक्रेत्या विधवा महिलेवर (Murder attempt to widow) तिच्या प्रियकराने कोयत्याने हल्ला केल्याची घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी प्रियकर रघुनाथ भोईरला (culprit arrested) काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News
अलिबाग : दहावी बारावीच्या परीक्षेसाठीची पायपीट थांबणार

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कॅम्प नंबर 5 मध्ये साई वसण शाह दरबारा जवळ 40 वर्षीय विधवा महिलेचा फुल- हार विक्रीचा व्यवसाय असून तिच्या दुकानात 55 वर्षीय रघुनाथ कृष्णा भोईर हा काम करत होता. त्यांचे प्रेमसंबंध जुळल्यावर काही दिवस ते एकत्र राहिले. मात्र महिलेची मुलं मोठी झाल्याने त्यांना दोघांचे प्रेमसंबंध पटत नव्हते. त्यामुळे महिलेने रघुनाथला वेगळे राहण्यास सांगितले होते. पण तो तिला सोडण्यास किंवा वेगळे राहण्यास तयार नव्हता.

प्रियकराची 5 लाखाची ब्लॅकमेलिंग

रघुनाथ हा सोडून जात नाही तसंच वेगळा राहत नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. शेवटी जर तुला मला सोडायचे असेल तर 5 लाख रुपये दे अशी ब्लॅकमेलिंग रघुनाथ करू लागला. त्यास महिलेने नकार दिला होता. त्यावरून आणखीन खटके उडू लागताच काल सोमवारी रघुनाथने दुकानात बसलेल्या महिलेच्या मानेवर, कानावर, कमरेवर कोयत्याने हल्ला करून पळ काढला होता. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात रघुनाथ भोईर यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.के.खेरडे यांच्या टीमने आरोपी रघुनाथ याला काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. रघुनाथला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण सारिपुत्र यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.