Veenatai Gavankar : वृक्ष लागवडीचा संस्कार रिचर्ड बेकर यांनी रुजवला; वीणाताई गवाणकर

आपल्या संस्कृतीत, साहित्यात वेदापासून वृक्षाचं महत्व सांगितलं आहे.
Veenatai Gavankar
Veenatai Gavankaresakal
Updated on

विरार : माझं बालपण गावामध्ये गेल्यामुळे लहानपणापासूनच मला पर्यावरणा विषयी जीज्ञासा, आवड होती, त्यामुळेच पक्षीतज्ज्ञ सलीम अली, पाणी पंचायतावाले विलास साळुंखे, एक होता कार्व्हर आणि आता अवघा देहची वृक्ष झाला हे रिचर्ड बेकर याचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. असे प्रतिपादन श्रीमती वीणाताई गवाणकर यांनी सामवेद भवन, उमराळे येथे संजीवनी परिवार आयोजित वृक्षांचा वाढदिवस कार्यक्रमात केले. रिचर्ड बेकर यांनी आफ्रिकी जन जीवनात वृक्ष लागवडीचा संस्कार कसा रुजवला याची कथा सांगून वृक्ष लावणे हे जीवनाचं अंग बनवल्याचं व वाळवंटात जंगल रुजवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं.

Veenatai Gavankar
Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नाना महालेंसह अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात

या कार्यक्रमासाठी संजीवनी वनराई चे प्रणेते मुरलीधर सायनेकर व त्यांच्या पत्नी माई खास ठाण्यावरून आले होते. सर म्हणाले आपल्या संस्कृतीत, साहित्यात वेदापासून वृक्षाचं महत्व सांगितलं आहे. वृक्ष म्हटला कि त्या बरोबर पक्षी व इतर परिसंस्था येतात असे सांगून वृक्षांवर प्रेम करा, त्यांची निगा ठेवा असा संदेश दिला.

Veenatai Gavankar
Nashik Crime News : निवाणे ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी माजी सरपंचासह दोघांना पोलिस कोठडी

सुरवातीला श्रीमती वीणाताई, सायनेकर सर, माई यांच्या हस्ते सामवेद भवन परिसरात अमलताश/ बहावा, कदंब वृक्षाचं रोपण करण्यात आले. राजू नाईक यांनी पाहुण्याचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं . यावेळी आर्यनमॅन आणि दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॅान ठराविक वेळेत पूर्ण करणा-या योगेश पाटील, आणि वृक्षरोपण मध्ये विशेष कामगिरी करणा-या अजय नाईक याचं कौतुक करण्यात आलं.

सुनील म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले तर किशोर वझे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अनंत पाटील , मनोहर पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश जोशी, जैमुनी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे, मनोज पाटील, राजेश नाईक उपस्थिती होते त्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.सकाळी पहाटे संजीवनी वनराई निर्मळ मंदिर परिसराला भेट देऊन १९ व्या वाढदिवसाच्या वृक्षांना परिवाराने शुभेच्छा दिल्या, कृतज्ञता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.