नोटांमुळे कोरोना पसरू शकतो का ? वाचा WHO चं काय म्हणणं आहे...

नोटांमुळे कोरोना पसरू शकतो का ? वाचा WHO चं काय म्हणणं आहे...
Updated on

मुंबई : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. संपूर्ण जगात तब्बल २०००० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६० च्या वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केलीये. मात्र लोकांमध्ये अजूनही कोरोनाबद्दल अनेक गैरसमज आहेत.

कोरोना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र पैशांचा व्यवहार केल्यामुळे कोरोना पसरतो का? बँकेच्या नोटांमधून कोरोना पसरू शकतो का? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता घाबरून जाऊ नका कारण पैशांमुळे किंवा बँकेच्या नोटांमधून कोरोना पसरत नाही असं खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

करन्सी सायकल असोशिएशन (CCA) या संस्थेनं ही माहिती दिली आहे. पैशांमुळे कोरोना व्हायरस पसरत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाहीये.

का पसरत नाही नोटांमुळे कोरोना व्हायरस:

CCA नं सर्व अधिकाऱ्यांना बँकेत पैशांचा व्यवहार करताना सॅनेटाईझरचा उपयोग करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच एटीएममध्ये प्रत्येक व्यवहारानंतर कीपॅड सॅनेटाईझरनं स्वच्छ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे नोटांमुळे कोरोना व्हायरस पसरणार नाही असं CCA नं म्हंटलं आहे.

मात्र जुन्या नोटांमुळे कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कोणाला पैसे देताना किंवा घेताना योग्य ती काळजी घ्या. पैशांच्या व्यवहारानंतर कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सॅनेटाईझरचा उपयोग करा आणि हात स्वच्छ करा. नोटांना हात लावल्यानंतर आपले हात नाकाला,तोंडाला,डोळ्यांना लावू नका असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय.

currency notes and spread of covid19 see what WHO has to say about this 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.