मुंबई : सुप्रीम कोर्टानं आर्थिक मागासांच्या आरक्षणाला (EWS) वैध ठरवलं आहे. याचं मी स्वागत करतो, कोर्टाचा हा निर्णय माईलस्टोन आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे आभार. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत EWS आरक्षणचा फायदा होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Currently EWS use for instead of Maratha reservation Devendra Fadnavis say about SC decision)
फडणवीस म्हणाले, एकीकडं जातीय आधारावरील आरक्षण कायम आहे पण ज्या घटकांना आरक्षण मिळत नव्हतं, ज्यांची स्थिती आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहे, त्यांना हे आरक्षण मिळायला लागलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील गरीबांना, अल्पसंख्यांकातील गरिबांना हे आरक्षण लागू राहणार आहे. याद्वेर सुप्रीम कोर्टानं त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.
कोर्टाचा निर्णय माईलस्टोन
या संदर्भात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलंडून आरक्षण दिल्याचा मुख्य मुद्दा होता त्याला आता सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलेलं आहे. त्यामुळं आजचा निर्णय माईलस्टोन आहे, यासाठी सुप्रीम कोर्टाचे आभार.
EWS च्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध?
उदीत राज यांनी आर्थिक निकषांवरील १० आरक्षणाची वैधता सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यानं त्यावर काँग्रेस नेते उदीत राज यांनी प्रतिक्रिया देताना सुप्रीम कोर्टही जातीयवादी असल्याचं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, उदीत राज यांच्या विधानावर काँग्रेसची ही अधिकृत भूमिका आहे का? हे स्पष्ट करावं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.