दिवाळीच्या खरेदीसाठी डी मार्ट मध्ये ग्राहकांची झुंबड, सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी

 दिवाळीच्या खरेदीसाठी डी मार्ट मध्ये ग्राहकांची झुंबड, सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी
Updated on

मुंबईः  दिवाळी जवळ आल्याने खरेदीसाठी नागरिकांची पावले आपोआपच बाजारपेठेकडे तसेच डी मार्ट कडे वळू लागली. परिणामी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. कर्जत पासून जवळच असलेल्या डी मार्टमध्ये तर नागरिकांनी तोबा गर्दी केली केल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. जसा काय कोरोना संपला की काय अशा आविर्भावात नागरिक विना मास्क चे सगळीकडे मुक्त संचार करत आहेत. त्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा उसळी मारून वर येण्याची दाट शक्यता असल्याने नियमांचे पालन करणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी तीव्र नाराजी दर्शविली आहे. तर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रशासन आणि नागरिकांना विसर पडला की काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

कोरोनाच मळभ तसेच मंदीचं सावट दूर होऊन बाजारपेठ फुलू लागल्या आहेत. ही बाब नक्कीच स्वागतार्ह्य आहे. मात्र कोरोना संपला नसून मागील काळात नागरिकांनी नियमांचे पालन करत योग्य काळजी घेतल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव फक्त सध्या कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम न पाळता चुका केल्यास कोरोना पुन्हा डोके वर काढेल आणि आता पर्यंत केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतील,वाया जातील त्यामुळे नागरिकांनी या सर्व बाबींचा विचार करून वागणे अत्यंत गरजेचे आहे.

 खेद आणि आश्चर्याची बाब म्हणजे जे प्रशासन यापूर्वी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायचे ते गायब झालेले दिसत आहे. जवळ जवळ ४० ते ५० टक्के नागरिक मास्क न घालताच बिनधास्त गर्दीत वावरत आहेत. तर काहींचा मास्क नाक किंवा तोंडाच्या खाली सरकलेला दिसत आहे.

इतके दिवस एकमेकांना दुरूनच हात जोडणारे आता उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात हस्तांदोलन करत आहेत. हे चित्र बघायला जरी सकारात्मक , छानसं वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र कोरोनाचा संसर्गाचा विचार करता गंभीर आहे तथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास हातभार लावणार आहे. त्यामुळे कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या संबंधित प्रशासनाने जागे होत याची तात्काळ दखल घेत यावर नियंत्रण मिळविणे अतिशय गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Customers throng De Mart for Diwali shopping no adherence social distance

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()