Cyclone Biporjoy : बीपरजॉय चक्रीवादळाचा रेल्वेला फटका; मेल-एक्सप्रेससह लोकल सेवा ठप्प!

अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला
Biporjoy Cyclone
Biporjoy Cyclone sakal
Updated on

मुंबई :अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. वैतरणा ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान चक्रीवादळाच्या वाऱ्यांमुळे ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) खांब कोसळले होते.

त्यामुळे मुंबईत येणाऱ्या लोकल सेवा - मेल एक्सप्रेस गाडयांच्या ठप्प पडल्या होता. त्यामुळे लोकल गाड्यासह अनेक मेल- एक्सप्रेस गाडयांचा वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी २ वाजता वैतरणा ते विरार दरम्यान चक्रीवादळ वाऱ्यामुळे विरार ते वैतरणा दरम्यानचे ओव्हरहेड वायरचे खांब खाली कोसळला.

Biporjoy Cyclone
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ 36 तासात आणखी तीव्र होणार! महाराष्ट्रासह चार राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

त्यामुळे चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकलसह मेल एक्सप्रेस गाड्या जागीच खोळंबल्या होत्या. या घटनेची माहीती मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल होऊन ओव्हरहेड वायरचा कोसळलेल्या खांब खांब बाजूला काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Biporjoy Cyclone
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळ; 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेलाच राहणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) च्या मालकीच्या पुलाचे सध्या परिसरात बांधकाम सुरू आहे. 'अत्यंत तीव्र' चक्रीवादळ बिपरजॉय पुढील चोवीस तासांत आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे. हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकणार आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले होते. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे अलर्ट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.