Cyclone Tauktae: डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू

नवी मुंबईतील पाम बीच रोड परिसरात घडली दुर्दैवी घटना
Cyclone Tauktae: डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू
Updated on

नवी मुंबई: रविवारी रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे पामबीच (Palm Beach Road) मार्गावरील सानपाडा (Sanpada) येथे विजेचा खांब स्कुटीवर पडल्याने एका तरुणाचा (Young Boy Died) जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी जखमी झाल्याची घटना घडली. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना नोंदवली. (Cyclone Tauktae 35 years old man accidental death as tree falls on vehicle another seriously injured)

Cyclone Tauktae: डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू
विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं...

या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव विशाल नरळकर असून तो ३५ वर्षांचा होता. तर जखमी झालेल्या त्याच्या सहकाऱ्याचे नाव स्वप्निल राठोड असं आहे. हे दोघेही ऐरोलीत वास्तव्यास होते. तसेच ते सीवूड्स येथील रिलायन्स मार्टमध्ये कामाला होते. रविवारी रात्री 9.30 वाजता कामावरुन सुटल्यानंतर दोघेही स्कुटीवरुन पाम बीच मार्गे ऐरोली येथे घरी परतत होते. रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कुटी पाम बीच मार्गावर सानपाडा येथील मोराज सर्कलजवळ आली असताना वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेला विजेचा खांब अचानक त्यांच्यावर पडला. यात विशाल आणि स्वप्निल दोघे जखमी झाल्याने त्यांना तत्काळ महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी विशाल नरळकर याला मृत घोषीत केले. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Cyclone Tauktae: डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

ठेकेदार व महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, पाम बीच मार्गावरील जुने झालेले विजेचे खांब काही महिन्यापुर्वीच बदलून या ठिकाणी नविन विजेचे खांब बसविण्यात आले होते. त्यामुळे नविन बसवलेला विजेचा खांब पडला कसा? असा प्रश्न आता उपस्थितीत केला जात आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत विशालच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. या घटनेनंतर सानपाडा पोलिसांनी देखील पाम बीच मार्गावरील विजेचे खांब बसविणारा ठेकेदार व विजेच्या खांबाच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहाणाऱ्यांची माहिती महापालिकेकडून मागिवली आहे. महापालिकेकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यात दोषी असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपुत यांनी दिली.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.