अलिबागमध्ये D-Mart संस्थापकांचं घरकुल; किंमत वाचून विस्फारतील डोळे!

मुंबईजवळ असलेल्या अलिबागमध्ये (alibaug) रिअल इस्टेटचा एक मोठा व्यवहार झाला आहे.
अलिबागमध्ये D-Mart संस्थापकांचं घरकुल; किंमत वाचून विस्फारतील डोळे!
Updated on

अलिबाग: मुंबई आणि आसपासच्या परिसरात रिअल इस्टेटमध्ये (real estate) सध्या एक तेजी दिसून येत आहे. कोरोना काळ आणि लॉकडाउन (lockdown) यामुळे मालमत्ता खरेदीचे अनेक व्यवहार रखडले होते. आता हे खरेदी-विक्रीचे (property purchase) व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. मुंबईजवळ असलेल्या अलिबागमध्ये (alibaug) रिअल इस्टेटचा एक मोठा व्यवहार झाला आहे. अलिबाग हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. समुद्रकिनारे, नारळीच्या बागांनी समृद्ध असलेल्या अलिबागला वीकेंडला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.

अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या सहा एकरमध्ये पसरलेल्या एका घराची तब्बल ८० कोटी रुपयांना विक्री झाली आहे. अलिबागच्या आवास गावामध्ये हे घर आहे. या भागातील रिअल इस्टेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असण्याची शक्यता आहे. एका पारसी बिझनेस कुटुंबाकडे सहा एकरमध्ये पसरलेल्या या घराची मालकी होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

अलिबागमध्ये D-Mart संस्थापकांचं घरकुल; किंमत वाचून विस्फारतील डोळे!
'काय जमाना आहे..' क्रांतीसाठी चित्रा वाघ यांचं खास टि्वट

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पत्नी श्रीकांतादेवी दमानी यांनी आवासमधील हे घर विकत घेतलं आहे. राधाकिशन दमानी हे सुपरमार्केट चेन डी-मार्टचे संस्थापक आहेत.मांडवा जेट्टीपासून हा प्लॉट ६ किलोमीटर अंतरावर आहे. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात राधाकिशन आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी दक्षिण मुंबईत नारायण दाभोळकर मार्गावरील एक बंगला विक्रमी १,००१ कोटी रुपयांना विकत घेतला होता.

अलिबागमध्ये D-Mart संस्थापकांचं घरकुल; किंमत वाचून विस्फारतील डोळे!
नाशिकमध्ये यंदा शिवसेना सत्तास्थानी असणार - संजय राऊत

गुरुवारी या खरेदी-विक्री डीलची नोंदणी झाली. सीआरझेड कायदा अस्तित्वात येण्याआधी १९८० साली जुन्या पद्धतीने हे घर बांधण्यात आले आहे. या जागेत अनेक फळझाडे आहेत. दमानी यांनी अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. २०१५ मध्ये राधाकिशन दमानी यांनी फाईव्ह स्टार रॅडिसन ब्ल्यू रिसॉर्ट् आणि स्पा मध्ये १३५ कोटी रुपयांना विकत घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.