Dadar Railway Station: 'दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर करा!' भीमसैनिकांची मागणी संसदेत, चंद्रशेखर आझाद म्हणाले...

Chandrashekhar Azad demand: दादर रेलवे स्टेशनचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर करणे ही भीम सैनिकांची दीर्घकालीन मागणी आहे.
mp Chandrashekhar Azad
mp Chandrashekhar Azadesakal
Updated on

मुंबईतील दादर रेलवे स्टेशनचं नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नावावर करण्यासाठी महाराष्ट्र भीम आर्मी तसेच विविध संघटनांनी अनेक वर्षांपासून आंदोलने केली आहेत. या मागणीला अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी संसदेत मांडल्याने आंबेडकरी समाजात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आणि मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी केली जात आहे.

परवा अशोक कांबळे यांनी भाई अॅड. चंद्रशेखर आझाद यांना पत्र पाठवून ही मागणी संसदेत मांडावी अशी विनंती केली होती. त्यानुसार, भाई अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी आंबेडकरी जनतेचा आवाज संसदेत मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

काँग्रेसचे मागणीतही सामील-

या मागणीसाठी काँग्रेसने देखील आपला आवाज उचलला होता. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चैत्यभूमीवर श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होती की, "राज्य सरकारने एलफिंस्टन रोड रेलवे स्टेशनचे नाव प्रभादेवी असे केले होते. त्याचप्रमाणे दादर रेलवे स्टेशनचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर  करणे आवश्यक आहे.

mp Chandrashekhar Azad
Kolhapur Flood: कोल्हापूरच्या मदतीसाठी धावली मुंबई, स्वच्छतेच्या कामासाठी महानगरपालिकेची टीम रवाना

भीम सैनिकांची दीर्घकालीन मागणी-

राज्य सरकारने २०१८ साली एलफिंस्टन रोड स्टेशनचे नामांतर प्रभादेवी केले होते. ओशिवारा येथे नवीन रेलवे स्टेशन बांधताना त्याचे नाव राम मंदिर ठेवले गेले होते. त्यामुळे दादर रेलवे स्टेशनचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर करणे ही भीम सैनिकांची दीर्घकालीन मागणी आहे. 

mp Chandrashekhar Azad
Mumbai Mounted Cops: मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलीस; सरकारची मंजुरी, कुठे-कुठे घालणार गस्त?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.