Mumbai News : एका दिवसात १८४१ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई! ५.५९ लाख रुपये दंड वसूल

दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे लोकलमधून फुकट्या प्रवासी संख्या वाढत जात असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढलेली आहे.
Dadar Railway Station
Dadar Railway Stationesakal
Updated on

मुंबई - दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे लोकलमधून फुकट्या प्रवासी संख्या वाढत जात असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळे या फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आता मध्य रेल्वेने दादर रेल्वे स्थानकांवर फुकट्या प्रवाशांची नाके बंदी करत सोमवारी दादर स्थानकात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १८४१ विना तिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून ५.५९ लाख रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, वेळेची बचत करण्यासाठी,गडबड आहे अशा विविध कारणांमुळे प्रवासी तिकिट न काढता लोकलने प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वेचे तिकिट तपासनीस दंडात्मक कारवाई करतात. मात्र तरी देखील विना तिकीट प्रवाशांची संख्या अद्याप घटली नाही. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून गर्दीच्या प्रमुख स्थानकांवर मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच सोमवार १८ डिसेंबर रोजी दादर स्थानकात या विशेष पथकाकडून तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये ७९ तिकीट तपासनीस आणि १९ आरपीएफ कर्मचारी यांचा समावेश होता. या मोहिमेत तब्बल १८४१ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, याद्वारे तब्बल ५.५९ लाख रुपये एवढा दंड मध्य रेल्वेने वसूल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.