Dahanu Crime: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा; मागितले ५ लाख

Economic Offenses Branch
Economic Offenses Branchesakal
Updated on

Dahanu Crime: जमीनदार महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुशील चुरी यांच्यावर खटला सुरू आहे. मात्र, न्यायालयात सतत गैरहजर राहिल्याने चुरी यांना न्यायालयाच्या आदेशानुसार वाणगाव पोलिसांनी बुधवारी (ता. १५) अटक केली.

Economic Offenses Branch
Crime News: धक्कादायक! रात्री घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करत अत्याचार

सुशील चुरी यांनी एका जमिनीच्या प्रकरणात वृषाली कलाल (रा. पोखरण, ठाणे) यांची डहाणू तालुक्यातील वणई येथे शेतजमीन आहे. दरम्यान, चुरी यांनी वृषाली कलाल यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

मात्र, खंडणी देण्यास त्यांनी नकार दिल्याने सुशील चुरी यांनी त्यांच्या साथीदारांसह वृषाली कलाल यांच्या वणई येथील जागेवर जाऊन त्यांना मानसिक त्रास दिला होता. याबाबत त्यांनी वाणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Economic Offenses Branch
Crime: मित्राला 'काळ्या' म्हटल्याचा आला राग; चाकूचा धाक दाखवत केली बेदम मारहाण

याबाबतचा खटला डहाणू प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असून चुरी हे अनेक वेळा सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाणगाव पोलिसांनी त्यांना बुधवारी दुपारी दोन वाजता अटक केली.

चुरी यांना गुरुवारी डहाणू प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती वाणगाव सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांनी दिली.

Economic Offenses Branch
Jalgaon Crime News : बसमध्ये चढताना महिलेची दीड लाखांची पोत लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.