Dahi handi 2021: सलग दुसऱ्यावर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाही

दहीहंडी उत्सवासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा मंडळं आणि उत्सव आयोजकांमध्ये महत्त्वाची बैठक झाली.
Dahi-Handi
Dahi-Handi
Updated on

मुंबई: दहीहंडी उत्सवासंदर्भात (dahi handi) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा मंडळं आणि उत्सव आयोजकांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. गोविंदा मंडळं (govinda mandal) उत्स्वासाठी आग्रही होती. पण "आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा (health) विचारच प्राधान्यांना करावा लागेल" अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) मांडली. दरम्यान यंदाच्यावर्षी सरसकट उत्सवाला परवानगी देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलय. दहिहंडी समन्वय समितीचे समन्वयक सचिन अहिर यांनी ही माहिती दिली. दहीहंडीतून जास्त कोरोना प्रसार होईल, अशी भूमिका टास्क फोर्सने मांडली.

"निर्णय घेताना काही लोक आंदोलन करतात. पण कोरोना घालवायला काहीतरी करा ना. राम कदमला पण हे लागू होतं. आपली बांधीलकी समाजासोबत आज हा बोध त्यांनी घ्यावा. शासन म्हणून आवाहन केल्यावर कोणी विरुद्ध करत असेल तर कायदा सुव्यवस्था आहे. बाळा नांदगावकर पण होते. पण सर्व गोष्टी चर्चा केल्यावर जर कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर काय बोलणार?" असे सचिन अहिर म्हणाले. बालगोपाळ आणि मंडळांनी शासनाच्या निर्णयातून सामाजिक उत्सव साजरा करावा असे ते म्हणाले.

Dahi-Handi
घनघोर लढाई? शेकडो तालिबानी फायटर्स निघाले पंजशीरकडे

महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या (govinda mandal) प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारही (ajit pawar) उपस्थित होते. "आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल" असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Dahi-Handi
पॉप स्टार आर्यना सईदने सांगितलं अफगाणिस्तानचं धक्कादायक वास्तव

"आंदोलन (protest) करायचं असेल तर कोरोना विरोधात करा. बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आलाय. इस्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केलीय. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलाय. आपण जर समजुतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.