Mumbai News : दहीकाल्याचा थरथराट संरक्षणात

ठाण्यातील २०० गोविंदा पथकांचा, तर मुंबईतील ७०० गोविंदा पथकांचा समावेश असून ९९ टक्के गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे
mumbai news
mumbai news sakal
Updated on

मुंबई - दहीहंडी उत्सव म्हटले की, दहीहंडीतील लोणी चाखण्यासाठी गगनचुंबी मानवी मनोरे रचण्यात येतात. हे मानवी मनोरे रचत असताना अनेकदा कोसळून अनेक गोविंदा जखमी होत असतात, काही जायबंदी, तर काही गोविंदांचा मृत्यू होत असतो. अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत ७५ हजार गोविंदांना विम्याचे कवच दिले आहे.

यामध्ये ठाण्यातील २०० गोविंदा पथकांचा, तर मुंबईतील ७०० गोविंदा पथकांचा समावेश असून ९९ टक्के गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे यंदा गोविंदांचा थरथराट संरक्षणात पाहावयास मिळणार आहे.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांत दहीहंडी उत्सव, तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात. प्रसंगी रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचारांची गरज पडते.

अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यंदाही मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. या मागणीची दाखल घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेत कार्यवाही पूर्ण केली.

त्याचा निर्णय काढण्यात आला. त्यामुळे एखाद्या गोविंदाचा थर रचताना मृत्यू झाला किंवा दोन अवयव गमवावे लागले तर १० लाखांची मदत मिळणार आहे. एक अवयव गमविल्यास पाच लाखांची मदत मिळणार आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाखांची; तर अंशत: अपंगत्व आल्यास निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार मदत मिळेल.

mumbai news
Mumbai Crime : रस्त्यावर गॅरेज थाटल्याचा जाब विचारताच; गॅरेज चालक, कर्मचाऱ्यांचा हल्ला

पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण

यंदाच्या वर्षी गोविंदांना मिळणाऱ्या विमा संरक्षणामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यभरातील ९८ टक्के गोविंदांना विमा कवच मिळाले आहे. यामध्ये ठाण्यातील २०० गोविंदा पथकांसह मुंबईतील ७०० गोविंदा पथक आणि पालघर, कल्याण, रायगड, बारामती, जळगाव, इगतपुरी येथील जवळपास ४०० गोविंदा पथकांचा यात समावेश असल्याची माहिती दहीहंडी असोसिएशनने दिली.

शासनाने गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा चांगला निर्णय घेतला. त्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातवरण आहे. तसेच शून्य टक्के गोविंदा अपघात हा यंदाचा मानस आहे. यासाठी जेवढे शक्य असेल तेवढेच थर रचून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पथकांना करण्यात आले आहे.

- समीर पेंढारे, उपाध्यक्ष, दहीहंडी असोसिएशन, महाराष्ट्र

रुग्णालयांची सज्जता

दहीहंडीच्या उत्सवाचा बेरंग होऊ नये यासाठी मुंबईतील पालिका आणि सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत. पालिकेच्या नायर रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीसाठी ५ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. यासह येणाऱ्या जखमी गोविंदांवर तात्काळ उपचारांसाठी एक टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.

mumbai news
Pune News : प्लॉट, प्लिंथ सोसायट्यांचा पुनर्विकास शक्य

गोविंदांना ऑर्थोपेडिक सर्जरीची गरज भासल्यास त्यांना पहिल्यांदा स्थिर करून दुसरीकडे शिफ्ट केले जाईल. कारण नायर रुग्णालयाची ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियागृह काही कारणास्तव बंद आहे. लागणाऱ्या औषधांचा साठाही तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातही जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी एका विशेष टीमची नेमणूक करण्यात आली आहे. ही आपत्कालीन टीम २४ तास सतर्क राहणार असून येणाऱ्या जखमी गोविंदांवर याच टीमतर्फे उपचार केले जातील. प्राध्यापक, निवासी डॉक्‍टर्स, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांची २४ तास शिफ्टनुसार ड्युटी लावली गेली आहे.  

mumbai news
Dahi Handi 2023: अंध मुलींनी लुटला दहीहंडीचा आनंद

आपत्कालीन विभागात एक अतिरिक्त टीम नेमली गेली आहे. या टीममध्ये वेगवेगळ्या विभागांतील डॉक्टर असणार आहेत. त्यात ऑर्थोपेडिक, रेडीओलॉजिस्ट, दंत शल्यचिकित्सा आणि मेडिसीन सर्जन्स, वैद्यकीय अधिकारी, तसेच इतर निवासी आणि वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी असतील.

त्यामुळे एखादा गोविंदा जर आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल झाला तर त्याच्यावर तात्काळ उपचार केले जातील; जर जास्त रुग्ण आले तर तत्काळ उपचार केले जातील, अशी माहिती सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

  मनुष्‍यबळ तैनात

उपनगरीय रुग्णालयातही आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास ८ ते १० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच एक्स-रे मशीन, आपत्कालीन औषधे आणि यासह सर्व वरिष्ठ डॉक्टरांना परिसरात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह प्रत्येक जखमी गोविंदांची नोंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

बेडची सुविधा

शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात १०, परळ येथील के. ई. एम. रुग्णालयात ७ बेड आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ बेड आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रुग्णालयांतही १०५ बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. पालिकेने तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी नियुक्‍त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.