Dahihandi utsav 2024: मुंबई-ठाण्यात ४६ गोविंदा जखमी; जखमींमध्ये १२ वर्षीय मुलाचा समावेश

Mumbai Dahihandi: ‘ढाक्कूम माक्कूम’च्या तालावर मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी मानवी मनोरे रचताना कोसळून ४६ गोविंदा जखमी झाले.
Dahihandi utsav 2024: मुंबई-ठाण्यात ४६ गोविंदा जखमी; जखमींमध्ये १२ वर्षीय मुलाचा समावेश
Updated on

Mumbai-Thane News: महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा उत्साह मोठा असतो. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात. मंगळवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये गोविंदांचे थरावर थर बघायला मिळाले. या उत्साहात अप्रिय घटनाही घडतात. मुंबई आणि ठाण्यात मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत अनुक्रमे ४१ आणि ५ असे ४६ गोविंदा जखमी झाले आहेत.

दहीहंडीच्या थरारात ४१ गोविंदा जखमी

मुंबई : दहीहंडी फोडण्याच्या उत्साहात थरावर उभे राहिलेले अनेक गोविंदा या वर्षीही जखमी झाले आहेत. पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४१ गोविंदा जखमी झाल्याची नोंद आहे.

पालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी गोविंदांपैकी एकाच्या खांद्याला मार बसला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे ऑर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. दोघांना ऑर्थोपेडिक विभागासाठी दाखल केले होते. सोमवारी सरावादरम्यान एक गोविंदाला मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने केईएममध्ये दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या बऱ्याचशा गोविंदांना हातापायाला खरचटले आहे. दरम्यान, ८ गोविंदांना पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावे लागले आहे. २६ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार केले गेले. ७ गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Dahihandi utsav 2024: मुंबई-ठाण्यात ४६ गोविंदा जखमी; जखमींमध्ये १२ वर्षीय मुलाचा समावेश
Pune Woman Murder: पुण्यातील 'त्या' तरुणीची हत्या दोन दिवसांपूर्वी? खराडी प्रकरणात नवी अपडेट

रुग्णालयांनुसार दाखल गोविंदा

सेंट जॉर्ज- २ पैकी एक अॅडमीट. दुसऱ्यावर ओपीडीत उपचार सुरूजी.

टी. रुग्णालय - १ अॅडमीट

पोद्दार- ६ गोविंदांवर तत्काळ उपचार करून डिस्चार्ज दिला.

केईएम ८ पैकी एकाला दाखल केले. ७ जणांवर ओपीडीत उपचार

नायर रुग्णालय - ५ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार

सायन -३ गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार

राजावाडी रुग्णालय - ३ जण अॅडमिट

एमटी अग्रवाल - १ अॅडमिट

कुर्ला भाभा रुग्णालय- एकाला दाखल केले; दुसऱ्याला ओपीडीत उपचार

शताब्दी गोवंडी रुग्णालय - दोघांवर ओपीडीत उपचार

वांद्रे भाभा रुग्णालय - तिघांवर ओपीडीत उपचार

कांदिवली शताब्दी- एकावर ओपीडीत उपचार

ट्रॉमा केअर- एकावर उपचार करून डिस्चार्ज, दुसऱ्यावर ओपीडीमध्ये उपचार

व्ही. एन. देसाई - दोघांवर ओपीडीत उपचार

जे. जे. रुग्णालयात एकावर उपचार

एका ३० वर्षीय गोविंदांवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो थरावरून पडल्याने त्याच्या तोंडावर आघात झाला आहे. सध्या उपचाराधीन असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

Dahihandi utsav 2024: मुंबई-ठाण्यात ४६ गोविंदा जखमी; जखमींमध्ये १२ वर्षीय मुलाचा समावेश
Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीमुळे अंकिता आणि डीपी दादामध्ये मतभेद ?, अंकिताने विचारला जाब

ठाण्यात सहा गोविंदा जखमी

ठाणे: ‘ढाक्कूम माक्कूम’च्या तालावर मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी मानवी मनोरे रचताना कोसळून सहा गोविंदा जखमी झाले. हे गोविंदा किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आल्याची रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाण्यातील दहीहंडी उत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. हा उत्सव मंगळवारी शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे शहरात विविध राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यामतून लाखोंचे बक्षीस लावत दहीहंडी उभारण्यात आले होते. या हंडीतील लोणी चाखण्यासाठी थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची हजेरी, गीत संगीतासह जल्लोष पहायला मिळाला.

मात्र यामध्ये गोविंदाचे मनोरे रचताना, थरावरून पडल्यावर, जखमी गोविंदासाठी तत्काळ मदतीसाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ठाणे पालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी ठाणे शहरात दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांचे अपघात होऊन सहा गोविंदा किरकोळ जखमी झाले. यामध्ये कार्तिक माने (वय १३), श्रेयस पाटील (वय १८), श्रवण कांबळे (वय १९), प्रतीक ठोके (वय १२), अनिश चंद्रवंशी (वय २०), आणि जिग्नेश तांबले (वय २६) हे गोविंदा जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.