Mumbai News : दहिसर-भाईंदर उन्नत रस्त्याने दहा मिनिटीत गाठणार अंतर

मुंबईतील पश्चिम उपनगरात दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) दरम्यान वाहतुकीचा महत्वाचा दुवा ठरणाऱ्या, दहिसर - भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) प्रकल्पातील निविदा प्रक्रिया यशस्वी.
Dahisar bhayander elevated road
Dahisar bhayander elevated roadsakal
Updated on

मुंबई - मुंबईतील पश्चिम उपनगरात दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) दरम्यान वाहतुकीचा महत्वाचा दुवा ठरणाऱ्या, दहिसर - भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) प्रकल्पातील निविदा प्रक्रिया यशस्वी होवून एक महत्वाचा टप्पा आज गाठला गेला आहे. या रस्त्याने पश्चिम उपनगर होणार सुसाट सुसाट होणार आहे. दहा मिनिटात अंतर गाठण्याचा उत्तम पर्याय या प्रकल्पाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

रस्ते वाहतुकीची पर्यायी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणाऱ्या या प्रकल्पात एक पूल आणि दोन आंतरबदल मार्गिकांचा समावेश आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान व्हावा तसेच मुंबई आणि भाईंदर ही दोन शहरे जोडण्यासाठी उन्नत मार्गाची आखणी करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी दिले होते.

त्यानुसार आराखडा तयार करून दहिसर-भाईंदर उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रकल्पाच्या निमित्ताने जलद वाहतुकीचा पर्याय दोन्ही शहरातील नागरिकांना मिळणार तर आहेच, समवेत सिग्नलचा अडथळा नसलेला मार्ग तसेच वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून या नवीन मार्गाचा वापर नागरिकांना करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. पी वेलरासू यांनी दिली आहे.

प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पुढील तीन वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही कंपनीची असेल.

एल अन्ड टीला काम

महानगरपालिका या पूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी एकूण ४५ मीटर रूंद आणि ५ किलोमीटर लांब अंतराच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेतील आर्थिक निविदेचा टप्पा यशस्वीपणे आज पार पडला.

महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी १ हजार ९९८ कोटी रूपयांच्या अंदाजित खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये लार्सन एण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) कंपनीने सर्वात कमी किंमतीची (१,९८१ कोटी रूपये) बोली लावली. त्यामुळे आता विहित प्रक्रियेनुसार या प्रकल्पाचे काम लार्सन एण्ड टुब्रो कंपनीला देण्यात येणार आहे.

मिरा भाईंदर हद्दीतील प्रकल्पासाठीच्या खर्चाचा परतावा हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत महानगरपालिकेला देण्यात येणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

-दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमेला कनेक्टिव्हिटी

-उन्नत मार्गाची एकूण लांबी- ५ किमी

-उन्नत मार्गाची रूंदी- ४५ मीटर

-एकूण मार्गिका- ८ (आठ)

-वाहनांचा अंदाजित वापर- ७५ हजार प्रति दिन

-प्रकल्पासाठी अंदाजित कालावधी- ४८ महिने

-प्रकल्पासाठी अंदाजित खर्च- १ हजार ९५९ कोटी रूपये

-देखभाल आणि दुरूस्ती खर्च- (३ वर्षे) २३ कोटी रुपये

-आंतरबदल मार्गिकांची संख्या- २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.