Palghar News : नुकसान ग्रस्त शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत; लोकप्रतिनिधी प्रचारात व्यस्त, शेतकरी हवालदिल

मोखाडा तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी वादळी पाऊस कोसळला आहे. तसेच काही भागात गारपीठ ही झाली आहे.
damage compansation to farmers
damage compansation to farmersSakal
Updated on

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी वादळी पाऊस आणि गारपीठीने शेकडो हेक्टर मधील आंबा आणि काजु च्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळ बागाईतदार पंचनामे करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.

तसेच नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे, कुठलेही आदेश शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे फळ बागाईतदार हवालदिल झाले असुन सरकार ने आम्हाला वार्यावर सोडल्याची संतप्त भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. 

मोखाडा तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी वादळी पाऊस कोसळला आहे. तसेच काही भागात गारपीठ ही झाली आहे. या अवकाळीने तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर याच पावसात तालुक्यातील शेकडो हेक्टर आंबा आणि काजु फळ आलेले बागं उध्वस्त झाले आहेत.

त्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. हाता तोंडाशी आलेले ऊत्पन्न अवकाळीने हिरावले आहे. त्यामुळे फळ बागाईतदार हवालदिल झाले आहेत.  मोखाड्यात  2  हजार  388 : 92  हेक्टर फळबाग क्षेत्र आहे. यामध्ये आंबा लागवडीचे  1  हजार  787 : 98  तर काजुचे  570 : 65  हेक्टर सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे.

तालुक्यात औद्योगिक वसाहत अथवा कारखानदारी नाही. केवळ खरीपाची शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. त्यात ऊत्पन्नाची पुरक बाब म्हणून फळबाग लागवड शेतकर्यांनी केली आहे. वर्षातुन एकदाच येणार्या आंबा आणि काजु च्या ऊत्पादनामुळे, शेतकर्यांना कुटूंबाचा चरीतार्थ चालविण्यास मोठा आर्थिक हातभार लागतो.

आता आंबा आणि काजु च्या ऊत्पनाला सुरूवात झाली होती, अचानक अवकाळीने घाला घालुन त्यावर पाणी फेरले आणि शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेले पीक हिरावुन नेले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे कुठलेही आदेश न दिल्याने फळ बागाईतदारांमध्ये, आम्हाला सरकार ने वार्यावर सोडल्याची संतप्त भावना निर्माण झाली आहे. 

तालुक्यातील कारेगांव- कडुचीवाडी, करोळ-पाचावर, किनिस्ते, ऊधळे- वाकडपाडा, आडोशी, वाशाळा, आसे , बेरिस्ते, आणि हिरवे पिंपळपाडा या ग्रामपंचायती क्षेत्रात वादळी पाऊस आणि गारपीठीने शेकडो हेक्टर मधील आंबा आणि काजु च्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये वसंत गंगा ठोमरे, 

पांडूरंग महादू ठोमरे, हरी कवजी ठोमरे, यशवंत सनु ठोमरे ,  किसन सानु ठोमरे , रमेश बुधा ठोमरे , गोविंद कावाजी ठोमरे , लक्ष्मण बाबुराव ठोमरे, पुरुष त्तम रामचंद्र ठोमरे, वाळू भाऊ ठोमरे , बाळू लहू भले, शंकर सोमा पोकळे , अरूण शिंदे या शेतकर्यांसह शेकडो शेतकर्यांना अवकाळीचा फटका बसला आहे.  

वर्षातुन एकदाच येणार्या या पिकाला शेतकरी वातावरणाला तोंड देऊन जपतो. या पीकामुळे कुटूंबाला आर्थिक हातभार मिळतो. यंदा आंबा काढून विक्रीस तयार असतांना, अवकाळीने त्यावर घाला घातला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत. अधिकारी आणि राज्यकर्ते निवडणुकीत व्यस्त आहेत, त्यांनी आम्हाला वार्यावर सोडले आहे.

- शंकर सोमा पोकळे, पीडीत शेतकरी, पोर्याचापाडा

अवकाळीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले नाहीत. तसेच सर्व यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तरी देखील कार्यालयीन कामासाठी हजर असलेल्या कर्मचार्यांकडुन नुकसान ग्रस्त भागाची माहिती घेतली जात आहे. 

- आकाश सोळुंखे, मंडळ कृषी अधिकारी, मोखाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.