Mumbai Crime : धावत्या लोकलमध्ये तरुणी सोबत डान्स होमागार्डला भोवला! पोलिसांनी केली कारवाई

धावत्या लोकल ट्रेनमध्ये रिल्स तयार करणारे अगोदरच रिल्सस्टार रेल्वेच्या रडारवर आले आहेत.
young girl dance with home guard in local train
young girl dance with home guard in local trainsakal
Updated on

मुंबई - धावत्या लोकल ट्रेनमध्ये रिल्स तयार करणारे अगोदरच रिल्सस्टार रेल्वेच्या रडारवर आले आहेत. रिल्ससाठी एका तरुणीसोबत धावत्या लोकलमध्ये नाचणाऱ्या होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे. या होमगार्डच्या तरुणीसोबत डान्स करण्याचा रिल्स समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच दादर लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहेत. एस.एफ, गुप्ता असे या होमगार्डचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

कमी वेळेत झटपट प्रसिद्धी मिळविण्यासाठी आजकाल तरुणांचा ओढा आहे. असंख्य रिल्स स्टारने रिल्स तयार कऱण्यासाठी अलीकडे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशन आणि लोकलला टार्गेट केल्याचे चित्र आहे. स्थानकावरीव गर्दीचा फायदा अचानक हे तरुण डान्स सुरु करतात. तर काही तरुण प्रवाशांबरोबर फ्रँक करण्याचे रिल्स तयार करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे रेल्वेचे डोके दुखी वाढली आहे.

नुकताच एका तरुणीने आपली रिल्स हिट करण्यासाठी महिला डब्यात तैनात असलेल्या होमगार्डला नाचण्यासाठी विनंती केली. त्यानंतर या होमगार्डने तिच्या बरोबर नाचणे सुरु केले. त्यानंतर तरुणीने होमगार्डबरोबर नाचत असलेला व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केले. नंतर समाज माध्यमांवर ही रिल्स पोस्ट केली. त्यानंतर गणवेशमध्ये असलेल्या होमगार्डला तरुणीसोबत डान्स करणे चागले महागात पडलं आहे.

असा आहे व्हिडीओ -

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १०. १० ते १०. १५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. एक अभिनेत्री-गायिका तिच्या मुलीसोबत चिंचपोकळी ते सॅन्डहर्स्ट रोड असा प्रवास करत होती. यादरम्यान तिची मुलगी डब्यात नाचू लागली तेव्हा होमगार्डने त्या तरुणीला नाचण्यासाठी हटकले होते. त्यानंतर तरुणीने होमगार्डला विनंती करत डान्स केला. नंतर होमगार्ड सुद्धा तिच्या बरोबर डान्स केला आहे.

होमगार्डवर कारवाई -

लोकल ट्रेनमध्ये डान्स करत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी तात्काळ या व्हिडीओची पडताळी केली. एस.एफ, गुप्ता या होम गार्डवर डिफॉल्ट रिपोर्ट दाखल करत त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.