Dasara Melava 2023 : एकीकडे अडीच लाख वडापाव तर दुसरीकडे घरची भाकर; कथा दोन्ही दसरा मेळाव्याची

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे मुंबईत आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.
Dasara Melava 2023
Dasara Melava 2023
Updated on

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे मुंबईत आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.

मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला मोठा इतिहास आहे. दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्याचून कट्टर शिवसैनिक या मेळाव्याला हजेरी लावतात. दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट वेगवेगळे मेळावे घेतले जात आहेत.

Dasara Melava 2023
Dasra melava 2023 : विजयादशमी अन् राजकीय पक्षांचे मेळावे; जाणून घ्या त्या मागचा इतिहास

शिंदे गटाकडून जेवणाची सोय

आज होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला येणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय आझाद मैदानावर करण्यात आली आहे. मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पाण्याची बाटली आणि फूड पॅकेट दिलं जात आहे. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचं जेवण यासाठी पॅकेट्स तयार केले जात आहेत. यासाठी टेंटची देखील सोय करण्यात आली आहे. आझाद मैदानावर दाखल होताना प्रत्येक कार्यकर्त्याला एक वडापावचं पॅकेट आणि पाण्याची बाटली देण्यात येणार आहे. यासाठी जवळपास अडीच लाख वडापाव तयार केले जात आहेत. सकाळ दुपार आणि रात्र या तिन्ही जेवणासाठी वेगवेगळे मेन्यू असण्याची शक्यता देखील आहे.

Dasara Melava 2023
Dasara Ceremony : कोल्हापूर, साताऱ्यात आज शाही सीमोल्लंघन; उदयनराजेंच्या जलमंदिरात होणार भवानी तलवारीचं पूजन

घरची भाकरी घेऊन शिवसैनिक शिवाजी पार्कवर

तर दादरच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या मैदानवर देखील कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली आहे. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला दरवर्षी स्वयंस्फूर्तीने राज्यभरातून शिवसैनिक येतात. यावेळी ते स्वतःच्या जेवणाची सोय स्वतःच करतात. यावेळी देखील शिवाजी पार्कवर सकाळीच पोहचलेल्या शिवसैनिकांनी आम्ही १० वर्षांपासून मेळाव्याला येत असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तसेच यावेळी हे शिवसैनिक स्वतःच्या घरातून भाकरी घेऊन आल्याचे पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.