मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या आझाद मैदानावरील सभेमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. याच खुर्चीवरुन त्यांनी आपलं शेवटचं भाषण केलं होतं.
यावेळी त्यांनी एक भावनिक आवाहनही शिवसैनिकांना केलं होतं. अशाच प्रकारे शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. (Dasara Melava Balasaheb Thackeray chair will be seen in Eknath Shinde Dasara Melava)
ठाण्यात सन २०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं शेवटचं भाषण केलं होतं. तब्येत ठीक नसल्यानं त्यांनी खुर्चीवर बसूनच हे भाषण केलं. त्यामुळं ही खुर्ची शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांच्या भाषणाची आणि त्यांच्या आठवणीची साक्ष देणारी वस्तू आहे. त्यामुळेच शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याच्या हेतूनं एकनाथ शिंदे यांनी ही खुर्ची आपल्या सभेत व्यासपीठावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
ही खुर्ची बाळासाहेब ठाकरेंची आठवण म्हणून बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. या वर्षीही बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)
विशेष म्हणजे याच खुर्चीत बसून भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांनी 'माझ्या उद्धवला सांभाळा' असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. त्यामुळं शिंदेंच्या मेळाव्यात दिसणारी ही खुर्ची, बाळासाहेबांचं शेवटचं आवाहन या गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.