मुंबई- शिवतीर्थावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दरवर्षी शिवसेनेचा (उबाठा) दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर पार पडत असतो. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर येत असतात. असाच एक कार्यकर्ता संगमनेर येथून दीडशे कार्यकर्त्यांसह सेना भवनात दाखल झाला आहे. शिवसेनेचा मुस्लिम मावळा अशी ख्याती या शिवसैनिकाची आहे.
अजीज याकूब मोमीन हा शिवसैनिक गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला येत असतो. आजही तो उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. शिवसेनेचा कट्टर मुस्लिम मावळा अशी ओळख अजीज याकूब मोमीन यांची आहे. शिवसेनेत फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले असले तरी अजीज याकूब यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली निष्ठा कायम ठेवली आहे.
अजीज याकूब मोमीन यांनी गळ्यामध्ये एक बॅनर घातलं असून त्यात त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. आदेश फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र विकणाऱ्या कलंकित गद्दारांना २०२४ मध्ये गाडून टाकू, मुस्लिम मावळा, असं त्यांच्या गळ्यातील बॅनरवर लिहिण्यात आले आहे. आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतील. लाखोंच्या संख्येने यावेळी कार्यकर्ते शिवतीर्थावर येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.