Dombivali News : दसरा मेळाव्याचे ठाकरे गटाचे बॅनर कल्याणमध्ये फाडले; ठाकरे गटाचे साईनाथ तारे यांनी लावले होते बॅनर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्यासाठीचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले आहेत.
dasara melava uddhav thackeray group banner damage
dasara melava uddhav thackeray group banner damagesakal
Updated on

डोंबिवली - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्यासाठीचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. यापैकी दुर्गाडी चौकात त्यांनी लावलेले भले मोठे बॅनर अज्ञाताने फाडल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तारे यांनी विरोधकांची निंदा केली आहे. आतापासूनच विरोधकांनी आपला धक्का घेतल्याने यासारखे घाणेरडे राजकरण सुरू केले असून अशामुळे निवडणुका जिंकता येणार नसल्याचे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून, त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर मागील दोन दिवसापासून तारे यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू आहे.

तारे यांनी दुर्गाडी चौकात शिवसेनेच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. हे बॅनर दुपारच्या सुमारास फाडल्याची टाकल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच तारे आणि काढलेल्या बॅनरची पाहणी केली.

यानंतर बोलताना तारे यांनी दुर्गाडी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बॅनर नव्हता. यामुळेच मी दसरा मेळाव्याचे जाहिरात करणारे अधिकृत बॅनर लावले होते. या मोठ्या बॅनरमुळे लोकांचे लक्ष या बॅनरकडे वेधले जात होते. विरोधकांनी तारे मामांचा इतका धक्का घेतला आहे की, त्यांनी बॅनरच फाडले आहे. इतक्या घाणेरड्या प्रकारचे राजकारण केले जाऊ नये.

दसरा मेळावा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला असून, या बॅनरवर बाळासाहेबांचा भला मोठा फोटो होता. बॅनर फाडून विरोधकांनी बाळासाहेबांच्या फोटोची विटंबना केली आहे. शहरात बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र विकृत विचार बुद्धीच्या लोकांनी हा जो प्रकार केला आहे तो निंदनीय आहे. या गोष्टीची मी निंदा करतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे तर याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.