अदानीचे टेंडर रद्द करणार आणि जागा पोलिसांना..! उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकार आल्यानंतरचा प्लॅन

Dasara Melava Uddhav Thackeray Speech: मविआचे सरकार आल्यानंतरचा प्लॅन काय असणार? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी याचे उत्तर दिले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray ESakal
Updated on

मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंनी आज दसरा मेळावा घेतला. यावेळी अनेक शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच काहीच दिवसात मविआचे सरकार येईल असा दावाही केला आहे. यात त्यांनी मविआचं सरकार आल्यानंतरचा त्यांचा प्लॅन सांगितला आहे. तसेच या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनीही पहिल्यांदा भाषण केले आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हरियाणात एकाला गोमांस तस्करी प्रकरणी मारलं. त्याचं नाव आर्यन शर्मा होतं. त्याची बातमी कुठे आली नाही. पण आर्यन खान नाव असतं तर हिंदुत्व खतरे मे है, असं म्हणाले असते. किरण रिजूजू मी गोमांस खातो ‌म्हणतात. मग मोदी कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: अदानी आमची जान, आम्ही दिल्लीत शेपूट हलवणारे श्वान... शिंदेंच्या घोषणेवरून ठाकरेंची जळजळीत टीका

ते म्हणाले की, कशाला जाती जातीत भांडणं लावता. धनगर समाजाला आरक्षण देणार होते त्याचं काय झालं? मी शहरी बाबू आहे. मला शेतीत काही कळत नाही.पण अमित शहा तुमच्या खोडाला दाढीवाली अळी लागली आहे आणि वर गुलाबी बोंडअळी लागली आहे, असं म्हणत ठाकरेंनी नाव न घेता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Uddhav Thackeray
Aditya Thackeray: उद्धव ठाकरे आले की भाषण करणार नाही.. पहिल्याच दसरा मेळाव्यात काय बोलले आदित्य ठाकरे? सांगितली हिंदुत्वाची व्याख्या

या सरकारने मित्रांच्या उद्योगांचे कर रद्द केले. थोडे दिवस थांबा ‌दोन महिन्यात आमचे सरकार येत आहे. जे जे चुकीचे निर्णय घेतले आहेत ते आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. अधिकाऱ्यांनो तुम्ही यांच्या पापात‌ सहभागी होऊ नका, असं माझं‌ पालिका आयुक्तांना आवाहन आहे. आमचं सरकार आल्यानंतर धारावीत पोलिसांना जागा देणार. सरकारने तीन लाख कोटी उधळून टाकले. कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी ‌करता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.