नवाब मलिकांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. इकबाल कासकरने सांगितलं की त्याचा मोठा भाऊ कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात असल्याचा जबाब या प्रकरणातल्या एका साक्षीदाराने दिला आहे. (Nawab Malik Money Laundering case)
नवाब मलिक मनी लाँडरिंग प्रकरणातला साक्षीदार खलिद उस्मान शेख याने ईडीकडे ही कबुली दिली आहे. त्याने ईडीला सांगितलं की, कासकरने मला सांगितलं की दाऊद त्याच्या माणसांकरवी पैसे पाठवतो. त्यालाही दर महिन्याला १० लाख रुपये मिळतात. काही वेळा कासकरने मला नोटांची गड्डीसुद्धा दाखवली आणि सांगितलं की है पेसे दाऊदभाईकडून आले आहेत.
खलिदचा भाऊ सलीम पटेल हा इकबाल कासकरचा लहानपणीचा भाऊ होता, जो गँगवॉरमध्ये मारला गेला. हा दाऊदची (Don Dawood Ibrahim) बहीण हसीना पारकरचा (Haseena Parkar) ड्रायव्हर आणि बॉडीगार्डही होता. पटेलने आपल्याला सांगितलं की तो आणि हसीना दाऊदच्या नावाने मालमत्ता हस्तगत करतायत आणि खंडणीही मागतायत, असंही खलिदने सांगितलं.
पटेलने हसीनासोबत मिळून अनधिकृतपणे मुंबईतल्या कुर्ला भागातल्या गोवावाला कम्पाऊंडची मालमत्ता हस्तगत केली आणि नंतर ती नवाब मलिकांच्या परिवाराला विकली, असा आरोप ईडीने केला आहे. कासकरसह हसीनाचा मुलगा अलिशाह यानेही दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचा दावा केला आहे. कासकरने सांगितलं की, दाऊदच्या पत्नीचं नाव मेहजबीन असून त्याला पाच मुलं आहेत. एका मुलाचं नाव मोईन आहे. त्याच्या सगळ्या मुलींची लग्न झाली असून मुलाचंही लग्न झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.