नवी मुंबई : खारघर जवळ असणाऱ्या पांडवकडा येथील धबधब्यावरुन ४ कॉलेजवयीन तरुणी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यातील चौथ्या तरुणीचा मृतदेह बेलापूरच्या खाडीत सापडल्याची माहिती खारघर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली. नेहा दामा असं त्या तरुणीचे नाव आहे.
मुसळधार पावसातही पोलीस आणि अग्निशमक दलाचे सर्च ऑपरेशन
नवी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. पांडवकडा धबधबा देखील तुफान कोसळत होता.असं असतानाही तरुणीचा शोध घेण्यासाठी खारघर पोलीस,अग्निशामक दलाने चांगलीच कंबर कसली. मुसळधार पावसात ही मंडळी तरुणीचा शोध घेत होती. पावसात मृतदेह वाहून जाऊ नये जाळीही लावण्यात आली होती मात्र पाण्याचा जोर प्रचंड असल्याने नेहा दामा हिचा मृतदेह वाहत बेलापूर च्या खाडीत एन आर आय पोलिस स्टेशनच्या हद्दीत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यावरुन वाहून गेलेल्या चारही तरुणी या नवी मुंबईतीलच एसआयईएस महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहेत. दरम्यान, पांडवकडा धबधबा गेले काही दिवस प्रचंड वाहत आहे. त्यामुळे हे ठिकाण धोकादायक असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. तसंच येथे जाण्यासही बंदी करण्यात आली होती. पण गोष्टीकडे कानाडोळा करत चारही तरुणींनी आपला जीव धोक्यात टाकला. शनिवारी सकाळच्या सुमारास चार तरुणी आणि इतर काही कॉलेजवयीन मुलं हे या पांडवकडा धबधब्याजवळ आले होते.
शहरानजीकच असलेल्या या धबधब्यावर अनेक पर्यटक येत असतात. पण काही अप्रिय घटना घडत असल्यामुळे पर्यटकांना येथे बंदी करण्यात आली आहे. अनेक पर्यटक हे उत्साहाच्या भरात धबधब्याजवळील पाण्यात उतरतात. पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. याबाबत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देऊन देखील पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे अशा घटना घडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.