Vaitarna Dam : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरण क्षेत्रात तरूणाचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

मोखाड्यातील (Mokhada) मध्यवैतरणा धरण (Vaitarna Dam) परिसरात तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Vaitarna Dam area Mokhada
Vaitarna Dam area Mokhadaesakal
Updated on
Summary

मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर हा धरण परिसर आहे. त्यामुळे गुन्हा करून मृतदेह व पुरावे नष्ट करण्यासाठी ह्या धरण परिसराचा सर्रास वापर केला जातो आहे.

मोखाडा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या, मोखाड्यातील (Mokhada) मध्यवैतरणा धरण (Vaitarna Dam) परिसरात तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात पुरूष आणि एका स्रीचा मृतदेह आढळले होते. आता तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात दोन महिन्यात, मृतदेह आढळल्याची ही तिसरी घटना घडली आहे.

त्यामुळे हा परिसर गुन्हे करून मृतदेह फेकून देण्यासाठी, गुन्हेगारांना आंदन ठरत असल्याने, येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोखाड्यात बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरण परिसरात गेली काही वर्षांपासून मृतदेह आढळत असल्याच्या घटना घडत आहेत. यावर्षी 3 फेब्रुवारीला अंगावर वार केलेला एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर 7 फेब्रुवारीला शिरच्छेद केलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता.

Vaitarna Dam area Mokhada
दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरवरच काळाचा घाला; 108 रुग्णवाहिकेची ट्रकला मागून जोरदार धडक

त्यानंतर याच परिसरात काही दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्याच्या (Kasara Police Station) हद्दीत एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. आज  24  मे'ला पुन्हा जखमी असलेला एका तरूणाचा मृतदेह येथे आढळून आला आहे. त्यामुळे मोखाड्यात खळबळ उडाली आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यात तिसरी तर धरण परिसरात मृतदेह आढळल्याची ही चौथी घटना घडली आहे. दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटली असून घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी दिली आहे.

Vaitarna Dam area Mokhada
Car Accident : दुचाकीवरून औषध आणण्यासाठी जाणाऱ्या सख्ख्या बहि‍णींवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोघी ठार, भाऊही जखमी

मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर हा धरण परिसर आहे. त्यामुळे गुन्हा करून मृतदेह व पुरावे नष्ट करण्यासाठी ह्या धरण परिसराचा सर्रास वापर केला जातो आहे. त्यामुळे गुन्हेगारीला हा धरण परिसर आंदन ठरत असल्याचे दिसून आले आहे. या घटनांमुळे मोखाड्यातील धरणा लगतच्या आदिवासी गावपाड्यांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.