Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Mumbai local: मुंबईतल लोकलच्या गर्दीमुळे अनेक अपघात होता. खांबाला धडकून, खाली पडून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहेत. त्यामुळे कोर्टाने देखील यावर चिंता व्यक्त केली.
Mumbai local
Mumbai localesakal
Updated on

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना त्यावर पाऊल ठेवणंही कठीण होतं. लोक ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात. दरम्यान लोकलच्या गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. असा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

तसेच अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाखाचे भरपाई देण्याचे आदेश देखील कोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. शुक्रवारी ही घटना घटली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.

दुसऱ्या घटनेत उल्हासनगर येथे राहणाऱ्या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय 55) यांचा ट्रेनमधून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते. (Mumbai Local Train News in Marathi)

Mumbai local
Dombivali News : आईसोबत मुंबईला नातेवाईकांकडे जाताना मृत्यूने गाठले; 24 वर्षीय तरुणाचा ट्रेनमधून पडून मृत्यू

तिसऱ्या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री 8.45 च्या सुमारास घडली.

Mumbai local
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.