Mumbai News : अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी; कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Abu Azmi Threat Call
Abu Azmi Threat CallEsakal
Updated on

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांना अज्ञाताने केलेल्या फोन कॉलवरून आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे सोमवारी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अबू आझमी यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abu Azmi Threat Call
Ajay Sengar: अजय सेंगर पुन्हा बरळले! संविधानविरोधी वक्तव्य केल्यानं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून चोप

अबू आझमीना अज्ञाताने 3 दिवसात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अबू आझमी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे

3 दिवसात हल्ला

आमदार अबू आझमी यांनी त्यांना मिळालेल्या धमकीबाबत ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी 3 दिवसांत जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिल्याचे सांगितले. या प्रकरणाची कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याचे ट्विटमध्ये आमदार अबू आझमी यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि मुंबई पोलिसांनी दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचे आवाहन आमदार अबू आझमी यांनी केले आहे.

Abu Azmi Threat Call
Devendra Fadnavis : ''अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी तुमचा मालक कोण होता?'' खडसेंचा कळीचा मुद्दा

औरंगजेबाच्या समर्थनामुळे धमकी

यापूर्वी अबू आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यामुळे जानेवारी महिन्यातही अबू आझमी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आमदार अबू आझमी यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन कॉलरने शिवीगाळ केली.

तसेच आझमीना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणीही अबू आझमीनी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.