Deccan Odyssey Train : CSMT वरून धावली डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०!

डेक्कन ओडिसीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ - पर्यटन मंत्री
Deccan Odyssey Train
Deccan Odyssey TrainSakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आलिशान डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनला पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सीएसएमटी स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले आहे. ही उदघाटन फेरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे व पनवेल ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावली आहे.

यावेळी पर्यटन व सांकृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशीसह अनेक रेल्वे अधिकारी उपस्थितीत होते.

डेक्कन ओडिसी या प्रकल्पास केंद्र शासन व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेच्या चेन्नई येथील फॅक्टरीत सन २००३ मध्ये डेक्कन ओडिसी ही आरामदायी ट्रेन तयार करण्यात आली. सन २००४ मध्ये तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डेक्कन ओडिसी ट्रेनचे उद्घाटन होऊन गाडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.

Deccan Odyssey Train
Mumbai News : धावत्या लोकलमध्ये बेली डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल !

सन २००४ -२०२० दरम्यान डेक्कन ओडिसी आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. परंतु सन २०२०-२१ मध्ये आलेल्या ‘कोविड’मुळे अन्य रेल्वे प्रमाणेच डेक्कन ओडिसीची देखील सेवा बंद झाली. आता पर्यटन क्षेत्र पूर्व पदावर आले असून त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन महामंडळ सज्ज झाले असून नियुक्त केलेल्या ऑपरेटरद्वारे २१ सप्टेंबर २०२३ पासून डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधेने पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरु होत आहे.

या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

डेक्कन ओडिसी ट्रेन ही राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात आलीशान ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल

- गिरीश महाजन, पर्यटन मंत्री

Deccan Odyssey Train
Mumbai News : गणेशोत्सव काळात 'स्टिंग रे', 'जेलीफीश' पासून सावधान; पालिकेचे नागरिकांना आवाहन

देशातील प्रसिद्ध असणाऱ्या रेल्वेपैकी एक असलेली ही ट्रेन सुरु झाल्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे. परदेशी पर्यटकामध्ये अत्यंत गाजलेली व पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती डेक्कन ओडिसी ट्रेन आता नव्या रूपात धावणार आहे. ही आपल्यासाठी अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे.

- ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

वर्ष २०२३-२४ सहलींचे आयोजन असे आहे

महाराष्ट्र स्प्लेंडर : मुंबई (सीएसएमटी)– नाशिक रोड – औरंगाबाद –पाचोरा - कोल्हापूर - मडगाव (गोवा) - सावंतवाडी,

इंडियन सोजन : मुंबई (सीएसएमटी) – वडोदरा – उदयपूर – जोधपूर – जयपूर – आग्रा – सवई माधोपूर – नवी दिल्ली.,

इंडियन ओडिसी : - नवी दिल्ली - सवईमाधोपूर – आग्रा - जयपूर- उदयपूर - वडोदरा - मुंबई सीएसएमटी.,

हेरिटेज ओडिसी : दिल्ली - आग्रा- सवई माधोपूर- उदयपूर - जोधपूर जैसलमेर - जयपूर – नवी दिल्ली.,

कल्चरल ओडिसी : दिल्ली - संवईमाधोपूर – आग्रा - जयपूर- आग्रा - ग्वाल्हेर झांशी –खजुराहो - वाराणसी - नवी दिल्ली.,

महाराष्ट्र वाईल्ड ट्रेन : मुंबई (सीएसएमटी)– छत्रपती संभाजी नगर – रामटेक – वरोरा – पाचोरा– नाशिक रोड - मुंबई (सीएसएमटी).,

दार्जिलिंग मेल : मुंबई (सीएसएमटी)– वडोदरा – उदयपूर- सवईमाधोपूर – जयपूर- आग्रा – बनारस –सिलीगुडी .,

दार्ज‍िलिंग मेल रिटर्न : सिलिगुडी – बनारस – आग्रा - सवईमाधोपूर- जयपूर – उदयपूर- वडोदरा - मुंबई (सीएसएमटी).,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.