Deccan Queen : डेक्कन क्वीनमध्ये उंदरीही प्रवासाला; व्हिडिओ व्हायरल

बुधवारी सीएसएमटीहून पुण्यासाठी जाणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील पासधारकांच्या डब्यात छतावरील लाइट कव्हरमध्ये उंदीर फिरत असल्याचे दिसून आले.
Mouse
Mousesakal
Updated on

मुंबई - एलटीटी-मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये उंदरांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा डेक्कन क्वीनमध्ये छतामधील लाईटच्या कव्हरमध्ये उंदरांचा वावर दिसून आला. यांसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पेस्ट कंट्रोलकरणाऱ्या कंत्राटदाराला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

बुधवारी सीएसएमटीहून पुण्यासाठी जाणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील पासधारकांच्या डब्यात छतावरील लाइट कव्हरमध्ये उंदीर फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर एका प्रवाशांनी आपल्या मोबाइलमध्ये या उंदरांचे चित्रीकरण करून आपल्या एक्स अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करून मध्य रेल्वेकडे तक्रार केली. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

Mouse
Mumbai Airport : विमान प्रवाशांसाठी खुशखबर! दररोज ९७५ विमानाचे होणार उड्डाण

त्यानंतर सर्वस्तरातून प्रवाशांनी नाराजी व्यक्ती केली आहे, त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे रेल्वे विभाग व्हिडीओ व्हायरल झाल्याने तातडीने गाडीतील उंदरांचा बंदोबस्त करण्यासह डेक्कन क्वीन निर्जंतूक करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागाला दिल्या.

तसेच डेक्कन क्वीनमध्ये उंदरांचा पेस्ट कंट्रोलची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर हलगर्जीपणा ठपका ठेवत दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.