SSC च्या भूगोलाचा लवकरच लागणार निकाल, वाचा महत्त्वाची बातमी...

SSC च्या भूगोलाचा लवकरच लागणार निकाल, वाचा महत्त्वाची बातमी...
Updated on

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. या विषयाचे गुणदान कसे करायचे याबाबतचा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडळाने शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. त्यामुळे या प्रस्तावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानतंर राज्यात दहावीचा भुगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने या विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. विद्यार्थांना गुणदान करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाला कळवले होते; मात्र भूगोल विषयाच्या गुणांबद्दल निर्णय न होत नसल्याने पालक संभ्रमात आहेत. 

तसेच शिक्षक संघटनाही या पेपरच्या गुणांचा तिढा सोडविण्याची मागणी करत आहेत. त्यानूसार मंडळाने भूगोल विषयाचे गुणदान करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. प्रस्तावावर या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.

decision on ssc geography exam will take soon by dept of education

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.