मुंबईत शिवसेनेला मुस्लिम समाजाची निर्णायक साथ

१९९३ मध्ये मुंबईत उफाळलेल्या दंगलीने धार्मिक तणाव निर्माण झाला. या दंगलीनंतर शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली.
१९९३ मध्ये मुंबईत उफाळलेल्या दंगलीने धार्मिक तणाव निर्माण झाला. या दंगलीनंतर शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली.
१९९३ मध्ये मुंबईत उफाळलेल्या दंगलीने धार्मिक तणाव निर्माण झाला. या दंगलीनंतर शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली.SAkal
Updated on

Mumbai News - मुंबईत यावेळी मुस्लिम वस्त्यांत बदलाचे नुसते वारे नव्हे तर सुनामी आल्याचे निकालातून स्पष्ट झाले. मुस्लिम मतदार पहिल्यांदा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहीला. मुस्लिमबहुल भागात मिळवलेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोन खासदार निवडून आले. तर काँग्रेसचा उमेदवाराच्या विजयात अल्पसंख्याक समाजाने मोलाची भूमिका बजावली आहे.

१९९३ मध्ये मुंबईत उफाळलेल्या दंगलीने धार्मिक तणाव निर्माण झाला. या दंगलीनंतर शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली. यामुळे मुस्लिम समाज कायमचा शिवसेनेपासून दूर झाला. मात्र तीन दशकानंतर मुंबईतील हे चित्र बदलले असून मुंबईत पहिल्यांदा मुस्लिम वस्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेनेला मतदान केल्याचे समाजाचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबई

या मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अरविंद सांवत यांनी ५३ हजाराने विजयी झाले. लोकसभा मुंबादेवी आणि भायखळा या दोन्ही मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघातून अरविंद सांवत यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक आघाडी घेतली. मुंबादेवीतून ४० हजार तर भायखळ्यातून जवळपास ४६ हजाराच्या आघाडी सावंत यांना मिळवून दिली.

ईशान्य मुंबई

गुजरातीबहुल मतदांराची मोठी लोकसंख्या असलेल्या ईशान्य मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या संजय दिना पाटील यांनी २९ हजार ८६१ मताने विजय मिळवला. गुजरातीबहुल मुलूंड,घाटकोपर पश्चिममध्ये भाजपच्या मिहीर कोटेचा यांनी पाटील यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली होती. मात्र मुस्लिमबहुल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी तब्बल ८७ हजार ९७१ मतांची आघाडी घेतल्याने ते विजयी झाले.

दक्षिण मध्य मुंबई

या मतदारसंघात शिवसेनेचे अनिल देसाई ५३ हजार मताने विजयी झाले. मुस्लिम प्राबल्य असलेल्या अणुशक्तीनगर व शीव, कोळीवाडा या मतदारसंघाने महत्वाची भूमिका बजावली. अणुशक्तीनगरमधून २९ हजाराची आघाडी तर शीव कोळीवाडा मतदारसंघातून ९,३१२ मतांच्या आघाडीमुळे देसाई यांना विजयापर्यंत पोचण्यात मदत मिळाली आहे.

काँग्रेसला तारले

वर्षा गायकवाड यांना कुर्ला, चांदीवली, वांद्रे पूर्व, कलिना या मुस्लिमबहुल मतदारसंघातून ७४ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे गायकवाड यांना उज्वल निकम यांनी घेतलेली ५८ हजाराची आघाडी तोडून विजय संपादन करता आला. तर उत्तर मुंबईतील सहा पैकी भाजपच्या पियूष गोयल यांनी पाच मतदारसंघामध्ये मताधिक्य घेतले. केवळ मालाड पश्चिम या मुस्लिमबहुल मतदारसंघात काँग्रेसच्या भूषण पाटील यांना १५३८ मतांची का होईना आघाडी मिळाली.

हिंदुत्व सोडून काँग्रेस सोबत गेलेल्या शिवसेनेबाबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुस्लिम समाजाला खात्री झाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत फतवे काढून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केले.

- दिपक केसरकर,नेते शिवसेना

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी भेदभाव न करता सर्व मुंबईकरांची काळजी घेतली.मुंबई पालिकेत अडीच दशकापासून शिवसेनेची सत्ता आहे.मात्र मुस्लिमधर्मियांसोबत काही भेदभाव झाला नाही. यासोबत संविधान वाचवण्याच्या नाऱ्यावरही मुस्लिम समाजाने शिवसेनेला भरभरून मतदान केले.

- फारुख इंजिनीयर, विचारवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.