Assembly Election 2024 : भाजपला घेरण्यासाठी सर्वपक्षीय खेळी? डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. म्हात्रे यांच्या प्रवेशाने शिंदे गटातून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, तसेच शिंदे गटाचे कार्यकर्तेदेखील शांत झाले आहेत. त्यातच म्हात्रे यांनी प्रभागात लावलेले युवासेना सचिव असा उल्लेख असलेले जुने बॅनर अद्यापही काढलेले नाहीत.
त्यातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जाणूनबुजून हे सगळे पेरले जात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीयांची ही खेळी सुरू आहे का याची चर्चा रंगली आहे.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पोषक असा विभाग मानला जातो. संघ विचारांना मानणारा एक मोठा वर्ग येथे आहे. यामुळे डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात १५ वर्षांपूर्वी मातब्बरांना डावलून रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी देण्यात आली. २००९ मध्ये रवींद्र चव्हाण या मतदारसंघाचे आमदार झाले. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले आणि चव्हाण राज्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये ते गणले जाऊ लागले. आता चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासारखे महत्त्वाचे खाते आहे. कोकणपट्ट्यात चव्हाण यांचे चांगले वजन वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातही चव्हाण यांचे वजन वाढल्याचे अलीकडे दिसू लागले आहे.
पक्षातील पदाधिकाऱ्यांचा कौल वरिष्ठांनी घेतला आहे. चव्हाण यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला तिकीट दिले जाऊ शकते का? याविषयी भाजपमधील इच्छुकांनी सांगितले. गेले तीन टर्म मंत्री चव्हाण येथील आमदार आहेत. जो काही निर्णय असेल तो पक्षातील वरिष्ठांचा असेल, परंतु वेगळा उमेदवार हा निवडला जाऊ शकतो. जगन्नाथ पाटील हे देखील या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यांनादेखील पक्षातील तत्कालीन ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी तुमचा उमेदवार कोण, अशी विचारणा केली होती. त्या वेळी देखील हरिश्चंद्र पाटील, भाई देसाई इच्छुक होते; मात्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. आताही पक्षाला वाटले तर ते वेगळा उमेदवार निवडू शकतात, अशी चर्चा आहे.
मागील तीन टर्म ते डोंबिवली विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघातच त्यांना आता आव्हान उभे राहील, असे षडयंत्र रचले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांच्यासाठी यंदाची लढाई कठीण होणार असल्याची चिन्हे आहेत, तसेच भाजपमधूनही आता एक वेगळे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. स्थानिक पातळीवर भाजपमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी, त्यातच संघाकडून होणारा विरोध आणि ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी होत आहे. त्यातच उदय कर्वे, राहुल दामले, मंदार हळबे हे या मतदारसंघातून उमेदवारी लढण्यास इच्छुक आहेत. पक्षाकडून उमेदवारांचा सर्व्हे सुरू आहे.
पक्षातील पदाधिकाऱ्यांचा कौल वरिष्ठांनी घेतला आहे. चव्हाण यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला तिकीट दिले जाऊ शकते का? याविषयी भाजपमधील इच्छुकांनी सांगितले. गेले तीन टर्म मंत्री चव्हाण येथील आमदार आहेत. जो काही निर्णय असेल तो पक्षातील वरिष्ठांचा असेल, परंतु वेगळा उमेदवार हा निवडला जाऊ शकतो. जगन्नाथ पाटील हे देखील या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यांनादेखील पक्षातील तत्कालीन ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी तुमचा उमेदवार कोण, अशी विचारणा केली होती. त्या वेळी देखील हरिश्चंद्र पाटील, भाई देसाई इच्छुक होते; मात्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. आताही पक्षाला वाटले तर ते वेगळा उमेदवार निवडू शकतात, अशी चर्चा आहे.
महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे किती सहकार्य मंत्री चव्हाण यांना मिळेल याविषयी चर्चा सुरू आहे. खासदार शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि युवासेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा ठाकरे गटातील प्रवेशाने अनेकजण चकीत झाले. चव्हाण यांच्याविरोधात लढण्यासाठी त्यांनी प्रभावी पदाधिकाऱ्यांशी जुळवाजुळवही सुरू केल्याची चर्चा होती.
खासदार शिंदे यांनी इतर पदाधिकाऱ्यांना रोखण्यात यश मिळविले; मात्र दीपेश यांना ते का रोखू शकले नाहीत, याविषयी आता वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटातील ताणलेले संबंध यापूर्वीही लपून राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत शिंदे सेनेतील एक महत्त्वाचा पदाधिकारी चव्हाण यांचा आव्हानवीर कसा होतो, अशी चर्चा आता भाजपच्या गोटातही दबक्या सुरात सुरू झाली आहे. बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे जोमाने काम करा, असा सल्ला खासदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला असला तरी गेल्या काही दिवसांत डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक काहीसे थंडावल्याचे दिसून येत आहे.
बॅनरवरून राजकीय नाट्य
दीपेश यांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दीपेश यांच्या मतदारसंघात नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. ठाकरे गटाच्या प्रवेशापूर्वी त्यांनी हे बॅनर लावले होते. त्यावर पक्षाच्या नावाचा, चिन्हाचा उल्लेख नव्हता. केवळ शिंदे गटातील त्यांच्या पदाचा उल्लेख होता. युवासेना सचिव व स्थायी समिती माजी सभापती, असा उल्लेख त्यांनी केला होता.
आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर नव्याने शुभेच्छा देणारे बॅनर प्रभागात लावले आहेत; मात्र जुने बॅनर शिवसैनिकांनी अद्याप उतरविलेले नाहीत. शिंदे गटाकडूनही त्यावर हरकत घेतलेली नाही. डोंबिवलीत विधानसभेत वाढदिवसाच्या एका बॅनरवरून राजकीय नाट्य घडत असताना आता चुप्पी का? शिंदे गटाचा म्हात्रे यांना पडद्यामागून पाठिंबा असेल का, अशीही चर्चा आहे.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.