मुंबई : आयुष्यभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आई-वडिलांचा भविष्यात भक्कम आधार होता यावे, यासाठी कठोर मेहनतीने शिक्षण पूर्ण केलेल्या चंद्रपूरच्या युवकाने प्रयत्न करूनही केवळ पैसे नाहीत म्हणून नोकरी मिळत नसल्याने निराश होऊन आपल्या पदव्याच विकायला काढल्याचा प्रकार समोर आला आहे. जगन्नाथ गायकांबळे असे या युवकाचे नाव असून त्याने समाजमाध्यमांवर पदव्या विकत घेण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाचे काय आहे कुशलच्या आत्महत्येचे कारण?
मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील केकेझरी गावचा रहिवासी असलेल्या जगन्नाथने, पारंपरिक शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थ्यांना जर नोकरी, व्यवसाय मिळवून देण्यात उपयोग होत नसेल, तर या पदव्या घेऊन फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या आई-वडिलांची हलाखीची अवस्था, आलेल्या पिकाच्या उत्पन्नातून सावकाराची देणी, लोकांची उधारी, कामगारांची मजुरी देऊन घरखर्चासाठी काहीच शिल्लक न उरण्याची जगन्नाथच्या वडिलांची स्थिती वर्षानुवर्षे तशीच होती. ती बदलण्यासाठी जगन्नाथने शिकून नोकरीचा ध्यास घेतला होता.
पाॅझिटीव्ह बातमी माथेरानमध्ये पर्यटकांवर सवलतींचा वर्षाव
जगन्नाथने लहानपणापासूनच जिद्दीने अभ्यास करून यश मिळवले. नंतर चंद्रपूर शहरात अर्धवेळ नोकरी करून पदवीपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर नागपूरला पदव्युत्तर पदवी आणि नंतर बी.एड्. शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जगन्नाथने नोकरीच्या शोधात अनेक शिक्षण संस्थांमध्ये मुलाखती दिल्या; मात्र लाखो रुपयांचे डोनेशन देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने जगन्नाथला नोकरी मिळाली नाही.
हे सुद्धा वाचा हायप्रोफाईल वेश्या व्यावसायाबाबत पोलिसांनी घेतला हा निर्णय
केव्हा तरी शिक्षणाची कदर होऊन, चांगली नोकरी मिळेल, या आशेने त्याने मासिक वेतनावर तीन हजारांची नोकरी स्वीकारली; मात्र तीन वर्षांनंतर संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने अचानक त्याच्या जागी डोनेशन घेऊन दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली. त्यानंतर जगन्नाथने स्टार्टअप, स्टॅंडअप इंडिया योजनेच्या माध्यमातून लघुद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी बॅंकांकडे अर्जही केला; मात्र व्यवस्थापकाने "हमीदारा'अभावी त्याचे कर्ज मंजूर केले नाही.
सावधान.. पेटीएम वापरणाऱ्यांनो सावधान
कुठेच यश मिळत नसल्याने पोटापाण्यासाठी जगन्नाथने अखेर एका कंपनीत रात्रपाळीत सुरक्षारक्षकाची नोकरी स्वीकारली आहे. अनेक प्रयत्नांती बीए, एम.ए., बी.एड्. शिक्षण पूर्ण केलेल्या जगन्नाथला आता ही शिक्षण व्यवस्थाच निरुपयोगी वाटत आहे. त्यामुळे त्याने आजपर्यंत घेतलेल्या सर्व पदव्याच विक्रीला काढल्याचे समाजमाध्यमावर जाहीर केले आहे.
पारंपरिक शिक्षण निरुपयोगी
पारंपरिक शिक्षण आधुनिक काळात निरुपयोगी ठरत असून आज पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची सोय महाविद्यालयांमध्ये असायला हवी, असे जगन्नाथने म्हटले आहे. त्यामुळे नोकरी न मिळाल्यास विद्यार्थ्याला किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय करण्याचा पर्याय तरी उपलब्ध असेल.
शिक्षक बनण्यासाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता असूनही नोकरी मिळत नाही. उच्च शिक्षित असूनही केवळ हमीदार नाही म्हणून बॅंक लघु उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देत नाही. त्यामुळे मी माझ्या बी.ए., एम.ए., बी.एड्.ची पदव्याच विकायला काढल्या आहेच. त्यामधून जी रक्कम मिळेल, त्यामधून व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन आहे.
- जगन्नाथ माधव गायकांबळे, पदवीधर तरुण, चंद्रपूर
फोटो ओळ
1. जगन्नाथ माधव गायकांबळे
2. जगन्नाथ गायकांबळे यांची फेसबुकवरील पोस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.