आयर्लंडमधून दिल्ली पोलिसांना कॉल आला आणि एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं; वाचा नेमकं काय झालं तर...

आयर्लंडमधून दिल्ली पोलिसांना कॉल आला आणि एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं; वाचा नेमकं काय झालं तर...
Updated on

मुंबई : दिल्लीतील सायबर क्राईम विभागाला शनिवारी सकाळी थेट आयर्लंडमधून कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की एक महिला व्यक्ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. पोलिसांना संशय आल्याने विचारणा केली असता फोनवर बोलणारा व्यक्ती हा फेसबुकमध्ये कार्यरत असून महिला व्यक्तीच्या फेसबुकवरील माहितीवरून संशय आल्याने तुम्हाला कळवत असल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सूत्रे हलवली. आणि थेट मुंबईत असलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात मुंबई पोलिसांनी यश आले. 

दिल्लीतील सायबर क्राईम विभागास शनिवारी सकाळी आयर्लंडमधून कॉल आला. ती कॉल करणारी व्यक्ती फेसबुकमध्ये अधिकारी होती. त्यांनी दिल्लीतील महिलेच्या नावावर असलेल्या अकाऊंटचा वापर करणारी व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. त्याबाबची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. दिल्लीचे पोलिस आधिकारी अन्येश रॉय यांनी तातडीने फेसबुक अकाऊंटची माहिती घेतली. फेसबुकवर असलेल्या दूरध्वनी क्रमांकाच्या आधारे पत्ताही शोधला. संबंधित महिलेस फोन करण्याऐवजी त्यांनी दूरध्वनी क्रमांकाचे लोकेशनद्वारे पत्ता शोधत नजीकच्या पोलिस ठाण्यावर जबाबदारी सोपवली. 

पूर्व दिल्लीतील पोलिसांनी तातडीने कारवाई करीत महिलेच्या घरी गेले त्यावेळी तिने आपला आत्महत्येबाबत कोणताही विचार नसल्याचे सांगितले. आपल्या फेसबुक अकाऊंटमुळे एवढा गोंधळ झाल्याची कोणतीही कल्पना तिला नव्हती. पण तिच्याशी बोलताना तिचा नवरा फेसबुक अकाऊंट वापरत असल्याची माहिती पोलिसांना समजली. एवढेच नव्हे तर तिचा नवरा चौदा दिवसांपूर्वी मुंबईला गेला असून तो तेथील एका हॉटेलमध्ये कुक असल्याचे समजले. 

त्यानंतर दिल्लीतील सायबर क्राईम पथकाने मुंबईतील याच विभागातील आधिकारी बालसिंग राजपूत आणि डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, दिल्लीतील महिलेच्या पतीचा क्रमांक बंद असल्याने ट्रेस होत नव्हता. मात्र डॉ. रश्मी यांनी प्रयत्न सोडला नाही. दरम्यान  पतीने फोन सुरु केला, त्यावेळी ते खूपच अस्वस्थ आणि निराश असल्याचे जाणवले. डॉ. रश्मी यांनी पतीला समजवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत त्या नंबरद्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आले. दिल्लीतील महिलेचे पती त्यावेळी भाईंदरला असल्याचे समजले. तातडीने भाईंदरच्या पोलिसांना सर्व कळवण्यात आली. भाईंदर पोलिसांचे पथक काही वेळातच पती असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सर्व परिस्थितीचा ताबा घेतला. अखेर त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.