नवी मुंबई - जेवणाचे पार्सल पोहोचवून परतणाऱया डिलीव्हरी बॉयचे भरधाव स्कुटी वरील नियंत्रण सुटल्याने सदर डिलीव्हरी बॉयचा खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. या अपघातातील मृत डिलीव्हरी बॉयने भरधाव स्कुटी चालवुन नेल्यामुळे सदर अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळुन आल्याने एपीएमसी पोलिसांनी मृत डिलीव्हरी बॉय विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव सुबोधकुमार नारायण यादव (25) असे असून तो मुळचा बिहार राज्यातला आहे. सध्या तो एपीएमसी सेक्टर-19 मधील हॉटेल देवीप्रसाद बारमध्ये जेवणाचे पार्सल डिलेव्हरीचे काम करुन त्याच ठिकाणी राहत होता. गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सुबोधकुमार हा वाशी परिसरातील जेवणाच्या पार्सलची ऑर्डर घेऊन स्कुटीवरुन जात होता.
यावेळी तो पार्सल देऊन हॉटेलमध्ये परतत असताना, दाणा मार्केट गेटसमोर सुबोधकुमार याचे भरधाव वेगात असलेल्या स्कूटर वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो रस्ता दुभाजकाला घासत जाऊन स्कुटीसह जोरात खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.